Goa Tourism: 'ब्रँड गोवा'साठी सरसावला पर्यटन विभाग; देशातील 'या' 6 इव्हेंटमध्ये सहभागी होणार

देशांतगर्त पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

Goa Tourism Department: देशांतर्गत पर्यटकांना आक्रमकपणे आकर्षित करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारचा पर्यटन विभाग देशातील विविध ६ इव्हेंट्समध्ये सहभागी होणार आहे. या महिन्यापासून एप्रिल 2024 पर्यंत हे सहा उपक्रम होणार आहेत.

कोलकाता येथे 14 ते 16 जुलै याकाळात ट्रॅव्हल अँड टुरिझम फेअर (TTF) होणार आहे. नवी दिल्लीत इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (IITM) 14 ते 16 सप्टेंबर या काळात होणार आहे. मुंबईत देखील इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (IITM) 12 ते 14 ऑक्टोबर या काळात नियोजित आहे.

Goa Tourism
Cansaulim News: कासावली येथील खाणीत 16 वर्षीय मुलगा बुडाला

तर गोव्यातही इंडिया ट्रॅव्हल मार्ट (ITM) मार्च 2024 मध्ये होणार आहे. याशिवाय एप्रिल 2024 मध्ये ग्रेट इंडियन ट्रॅव्हल बाजार जयपूर येथे होणार आहे. या सर्व कार्यक्रमात राज्याचा पर्यटन विभाग सहभागी होणार आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर रोड शो आणि ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी होणाऱ्या गोवा टुरिझमच्या पाऊलावर हे पाऊल उचलण्यात आले आहे.

राज्याचा पर्यटन विभाग महाराष्ट्र, कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि केरळमधील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन स्थानिक पर्यटकांना आकर्षित करण्याचे नियोजन करत आहे. पर्यटकांची संख्या आणि सोशल मीडिया आकडेवारी यात ही राज्ये टॉपवर असल्याचे समोर आले आहेत.

तथापि, गोव्यातील पर्यटनाचा प्रचार केवळ या राज्यांपुरता मर्यादित राहणार नाही, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

Goa Tourism
Karnataka-Goa Highway: कर्नाटक-गोवा महामार्गावर टोल वसुलीला सुरवात

कोविड महामारीनंतर जुलै 2020 पासून पर्यटन क्षेत्र पुन्हा सुरू झाले. टुरीझम मास्टर प्लॅन आणि धोरण 2020 च्या अनुषंगाने, पर्यटन विभागाने पर्यटनाच्या अधिक जबाबदार स्वरूपाच्या प्रचारासाठी आपले धोरण पुन्हा केंद्रित केले आहे.

बीचेस, पार्टीज यापलीकडे जाऊन गोव्याची एक वेगळी ओळख आहे. चांगल्या, दर्जेदार सेवेसाठी जास्त पैसे मोजण्यास ग्राहकांची हरकत नसते. ते लक्षात घेऊन अधिक जबाबदार पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करण्याची विभागाची इच्छा आहे.

गोव्यातील अनोखी ठिकाणे, विशिष्ट संस्कृती, समृद्ध वारसा, नैसर्गिक आकर्षणे आणि अनपेक्षित ठिकाणे दाखवून दर्जेदार पर्यटनाला चालना देण्याचा प्राधिकरणाचा मानस आहे.

पर्यटनविषयक अशा कार्यक्रमात सहभागी होऊन देशांतर्गत बाजारपेठेत विभागाला ब्रँड गोव्याचा आक्रमक प्रचार करायचा आहे. गोव्याच्या पर्यटनाचे मार्केटिंग करायचे आहे. या इव्हेंटमधील उपस्थिती त्या दृष्टीने लाभदायी ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com