heavy rainfall in Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Rain: हवामान खात्याचा इशारा ठरला खरा,राजधानी पणजीसह उत्तर गोव्यात जोरदार पाऊस; Watch Video

IMD rain alert Goa: आता पावसाने राज्यात ठीक ठिकाणी हजेरी लावायला सुरुवात केली आहे

Akshata Chhatre

पणजी: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून पावसाळी वातावरण कायम आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार संपूर्ण महाराष्ट्र राज्यासह कोकण, गोवा राज्यात पुढील काही दिवसांसाठी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला होता, त्याप्रमाणे आता पावसाने राज्यात ठीक ठिकाणी हजेरी लावायला सुरुवात केली आहे.

काही वेळापूर्वीच हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ तासांत दक्षिण गोव्यात काही ठिकाणी गडगडाटी वादळासह मध्यम पाऊस आणि ४०-५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती

त्याप्रमाणेच राजधानी पणजीसह उत्तर गोव्यात पर्वरी, डिचोली येथील काही भागांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी झाली आहे.

राज्यातील या भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस पडला असून सध्या वातावरण ढगाळ आहे, परिणामी येणाऱ्या काळात आणखीन पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते.

हवामान खात्याचा अंदाज 'अचूक'

हवामान खात्याने गोव्‍यासह १६ राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा जारी केला होता. राज्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे.

काही ठिकाणी पाऊसही पडत आहे आणि अशात हवामान खात्‍याने २०, २१, २२ मे रोजी ऑरेंज अलर्ट दिला आणि या काळात मुसळधार पाऊस पडू शकतो अशी शक्यता वर्तवली, जी खरी ठरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

River Pollution: म्हापसा नदीच्या पाण्यात फिकल कोलिफॉर्म 17 पट जास्त! प्रदूषणाच्या अहवालाने चिंता वाढवली

Baba Vanga Prediction: 2026 संपण्यापूर्वी जगाचा विनाश होणार? बाबा वेंगा यांच्या कथित भविष्यवाणीने जगभरात खळबळ, नेमकं काय सांगितलंय भाकितात?

खरी कुजबुज: 'तो' आवाज कुणाचा?

Abhishek Sharma Record: 69 षटकार... अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी! सूर्यकुमार यादवचा 4 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, केली 'ही' मोठी कामगिरी

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

SCROLL FOR NEXT