Goa Rain: डिचोली, सत्तरीला अवकाळीचा दणका! वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड; अनेकांचे नुकसान

Goa Wather: सत्तरीत रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक कोंडी झाली. होंडा येथे योगेश नाईक यांच्या घराच्या शेडवर काजुचे झाड पडून सुमारे २० हजारांचे नुकसान झाले.
Goa Weather
Goa RainDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली/वाळपई: अवकाळी पावसाने आज धुमाकूळ घालताना डिचोली व सत्तरी तालुक्यातील विविध भागातील जनतेची अक्षरशः दाणादाण उडवली. काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली असली, तरी मुळगाव भागात दोन ठिकाणी झालेली फांद्यांची पडझड वगळता, सायंकाळपर्यंत झाडांची पडझड झाली नाही, परंतु सत्तरीत अनेक ठिकाणी झाडांची पडझड होऊन अनेकांचे नुकसान झाले.

शुक्रवारी दुपारी ढगांच्या गडगडाटासह पडलेल्या पावसाने डिचोलीतील बहुतेक सर्व भागात हजेरी लावली. दुपारी साधारण तासभर पाऊस पडला. नंतर पावसाने उसंत घेतली. मात्र, सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण होते.

सत्तरी तालुक्याच्या भागात आज दुपारी अवकाळी पावसाचा फटका बसला. यात वादळी वारा, गडगडासह पावसाने हजेरी लावली. त्यात पर्ये मतदारसंघात अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे. होंडा - सत्तरी येथे बेरीटो गॅरॅजजवळ माटकर यांच्या घराजवळ रस्त्याच्या बाजुला असलेले काजुचे झाड मोडून रस्त्यावर व कुंपनावर पडून कुंपन मोडले. यात सुमारे ५ हजाराचे नुकसान झाले, तर २० हजाराची मालमत्ता वाचविण्यात यश आले.

वेळुस वाळपई येथील रवळनाथ मंदिरा जवळ रस्त्यावर ऑईल सांडल्याने रस्ता वाहतुकीस धोडादायक बनला होता. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी रस्त्यावर पडलेले ऑईल काढुन रस्ता सुरळीत केला. वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी टप्याटप्याने घडनास्थळी जाऊन पडलेली झाडे हटविली. त्यात कृष्णा नाईक, ज्ञानेश्वर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली इतर जवान तुळशिदास झर्मेकर, ए. व्ही. नाईक, आर. नाईक, एस. के. नाईक, एस. के. गावकर आदी जवानांचा समावेश होता.

Goa Rain
Flood in SattariDainik Gomantak

दरम्यान, पेडणे तालुक्यात आज संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास वीजा आणि गडगडासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ पाऊस पडला. त्यामुळे दुचाकीने प्रवास करणाऱ्यांची तारांबळ उडाली.

Goa Weather
Goa Weather Update: गोवेकरांना मिळणार उकाड्यापासून दिलासा! अवकाळी पावसाचा 'यलो अलर्ट' जारी

घरावर झाड पडून नुकसान

सत्तरीत रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतूक कोंडी झाली. होंडा येथे योगेश नाईक यांच्या घराच्या शेडवर काजुचे झाड पडून सुमारे २० हजारांचे नुकसान झाले. तसेच घोटेली - सत्तरी येथे आंब्याचे झाड घरावर पडून ४० हजारांचे नुकसान झाले, तर ५० हजाराची मालमत्ता वाचविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.

Goa Weather
Goa Rain: राज्यात सरी बरसणार! वादळी वाऱ्यासाह पाऊस लावणार हजेरी; तीन दिवसांसाठी यलो अलर्ट

अनेकजण पडले अडकून

हवामान खात्याने ‘यलो अलर्ट’ जाहीर केला होता. तरीदेखील आजच्या अवकाळी पावसामुळे डिचोली परिसरात अनेकजण वाटेत अडकून पडले. अवकाळी पावसामुळे काजू पीक व्यवसाय संकटात आला आहे. दरम्यान, हवामान खात्याने उद्याही ‘यलो अलर्ट’ जाहीर केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com