Professional League Football Tournament Dainik Gomantak
गोवा

Professional League Football Tournament: गार्डियन एंजलच्या विजयात ज्योएलचा गोल

गार्डियन एंजल क्लबने मागील लढतीत वास्को क्लबला पराभूत केले होते

किशोर पेटकर

Professional League Football Tournament ज्योएल बार्रेटो याने नोंदविलेल्या शानदार गोलच्या बळावर गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबने गोवा प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत बुधवारी सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी सेझा फुटबॉल अकादमीस 1-0 फरकाने हरविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

सामन्यातील निर्णायक गोल सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या ज्योएल याने 77 व्या मिनिटास नोंदविला. गार्डियन एंजल क्लबने मागील लढतीत वास्को क्लबला पराभूत केले होते.

लागोपाठ दोन सामने जिंकल्यामुळे त्यांचे आता सहा गुण झाले आहेत. पराभवामुळे दोन लढतीनंतर सेझा अकादमीचे तीन गुण कायम राहिले. अगोदरच्या फेरीत त्यांनी यंग बॉईज टोंक संघाला चार गोलने सहज हरविले होते. स्पर्धेत गुरुवारी (ता. ७) वास्को स्पोर्टस क्लब व पॅक्स ऑफ नागोवा यांच्यात धुळेर स्टेडियमवर सामना होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajay Kholkar Disciplinary Action: आरजीपीला मोठा धक्का! वरिष्ठ पदाधिकारी तथा खजिनदार अजय खोलकर यांची पक्षातून हकालपट्टी

Canacona Construction Workers: काणकोणात मजुरांच्या मनमानी मजुरीला लगाम! गवंड्यांसाठी 1200 रुपये किमान वेतन निश्चित

Navpancham Rajyog 2026: 16 सप्टेंबरला आकाशात घडणार मोठा चमत्कार! गुरु-चंद्राचा दुर्मिळ 'नवपंचम राजयोग'; 4 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Five State Assembly Elections: 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा वेध! 'जेन-झी' मतदार ठरणार गेमचेंजर; मोदी सरकारसमोर तरुणांना आकर्षित करण्याचे मोठे आव्हान

VIDEO: 'ट्रॉफी चोर, ट्रॉफी चोर'! टीम इंडियाच्या विजयानंतर मोहसिन नक्वीची फजिती; भारतीय चाहत्यांच्या घोषणाबाजीचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT