Water Issue In Goa: काणकोणात 'हर घर जल'चे तीन तेरा, सरकारी ऑफिसांचीच 'अशी' अवस्था तर सर्वसामान्यांची काय गत, वाचा..

कार्यालयाच्या टेरेसवर पाण्याची टाकी असून सध्या काही कारणास्तव टाकीत पाणीच नाहीय.
Water issues in Canacona
Water issues in CanaconaDainik Gomantak
Published on
Updated on

Water Issue In Goa सरकारने हर घर जल योजना सुरु केलीय खरी पण सरकारी कार्यालयातच जर पाण्याची वानवा असेल तर? काणकोणमधील सरकारी ऑफिसमधील बेसिनमध्ये आणि स्वच्छतागृहामध्ये पाणीच येत नसल्याचा प्रकार समोर आलाय.

जर सरकारी ऑफिसांमध्ये अशी अवस्था असेल तर सर्वसामान्यांची काय गत असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलाय.

Water issues in Canacona
Ponda Road Accident: ढवळी-बायपास रोडवर अपघात; भरधाव कारची दुभाजकाला धडक, घटनास्थळी गर्दी

विशेष म्हणजे या प्रकाराचे व्हिडीओ आता सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांवर व्हायरल होऊ लागले आहेत. या संबंधी अशी माहिती समोर आलीय की, काणकोण येथील उत्पादन शुल्क आणि सिव्हिल रजिस्ट्रार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सध्या पाण्याची समस्या भेडसावत आहे.

Water issues in Canacona
Ribandar Road Closed: महत्वाची बातमी! 'एवढ्या' दिवसांसाठी राहणार रायबंदर रस्ता बंद

कार्यालयाच्या टेरेसवर पाण्याची टाकी असून सध्या काही कारणास्तव टाकीत पाणीच नाहीय. परिणामी कार्यालयातील बेसिनमध्ये आणि स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची कमतरता जाणवत आहे. कर्मचाऱ्यांना त्यांनी स्वतः घरून भरून आणलेल्या पाण्याच्या बाटल्यांवर काम भागवावे लागत आहे. थोडक्यात या सर्व प्रकारामुळे सरकारच्या स्वच्छ भारत मिशनवर देखील आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com