Shahapur villagers demand underpass Dainik Gomantak
गोवा

Ponda News: ...अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; शापूरवासी आक्रमक

सिग्नल, भुयारी मार्गासाठी शापूरवासी आक्रमक

गोमन्तक डिजिटल टीम

Shahapur villagers demand underpass फर्मागुढी-फोंडा महामार्गावरील चौपदरी रस्त्यावर शापूर येथे त्वरित सिग्नल यंत्रणा उभारा आणि भुयारीमार्ग (अंडरपास) बांधण्याची कार्यवाही करा, अशी जोरदार मागणी शापूर व लगतच्या भागातील नागरिकांनी केली.

रविवारी शेकडो नागरिकांनी काही वेळ महामार्ग रोखून धरला व ही मागणी सहा महिन्यांत पूर्ण न झाल्यास येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालू, असा इशाराही दिला. यावेळी नागरिकांसमवेत आजी-माजी पंचसदस्य तसेच आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शापूरकडे पारंपरिक रस्ता चौपदरी बांधकामावेळी बंद केला. मात्र, आता फोंड्यातून शापूरकडे जायचे झाल्यास जीव्हीएम सर्कलला वळसा घालून जावे लागते. यामुळे वाहनचालकांना दोन किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतो.

त्यामुळे इंधन व वेळ वाया जातो. सध्या शापूरकडे जाण्यासाठी ठेवलेला रस्ता अरुंद असून वाटेवर वाहने उभी केलेली असतात. त्यामुळे वाहनचालकांच्या अडचणीत भरच पडते.

शापूर येथील सिग्नल यंत्रणा आणि अंडरपास उभारण्यासाठी फोंडा तालुक्‍यातील चारही मंत्र्यांनी लक्ष घातले पाहिजे. येथील कदंब बसस्थानक तसेच वाहतूक कार्यालय हे चारही मतदारसंघांशी निगडित आहे. त्‍यामुळे मंत्र्यांनी बसगाडीतून प्रवास करावा, म्हणजे सर्वसामान्यांची व्यथा त्यांना कळेल. - ॲड. सुरेल तिळवे, ‘आप’ नेते, फोंडा.

निवेदन सादर-

शापूर येथील वाहतूक व्यवस्थेचा घोळ दूर करण्यासाठी सिग्नल यंत्रणा उभारण्याबरोबरच अंडरपास उभारावा, यासाठी मुख्यमंत्री आणि राज्यपालांना निवेदन दिले असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: धक्कादायक! अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून लैंगिक अत्याचार; डिचोलीतील खळबळजनक घटना

Bhandari Samaj Committe: अशोक नाईक गटाला मोठा धक्का! महानिबंधकांनी समिती ठरवली बेकायदेशीर; भंडारी समाजातील वाद

Rashi Bhavishya 24 October 2024: प्रयत्नांतून यश मिळेल,कार्य करत रहा; आजचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे... जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Goa News: धक्कादायक! अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध गुन्हा नोंद

Waste Management Projects: कुडचिरेवासियांच्या आंदोलनाला यश; प्रस्तावित बांधकाम कचरा निर्मूलन प्रक्रिया प्रकल्प होणार रद्द!

SCROLL FOR NEXT