Netravali: मैनापी धबधब्‍यावर 15 वर्षांपूर्वीच्या घटनेची पुनरावृत्ती; एकाला वाचवताना दुसराही बुडाला

सांगेतील हृदयद्रावक दुर्घटना : एकाचा मृतदेह सापडला; शाेध सुरूच
Two drowns at Mainapi Waterfall Netravali
Two drowns at Mainapi Waterfall NetravaliDainik Gomantak
Published on
Updated on

Two drowns at Mainapi Waterfall Netravali नेत्रावळी-सांगे येथील मैनापी धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या दोघा पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेत जनार्दन सडेकर हे बुडणाऱ्या युवकाला वाचवण्यासाठी गेले.

मात्र, युवकासोबत तेही बुडाले. बुडालेल्या युवकाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. मात्र, सडेकर यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात यश आले आहे.

मैनापी धबधब्यावर पावसाळी पर्यटनासाठी फोंडा येथील एलआयसी कार्यालयातील ११ पुरुष आणि तीन महिला अधिकारी, कर्मचारी आले असता मैनापी धबधब्याच्या पाण्यात मूळ सावर्डेचा पण सध्या वास्को येथे राहणारा शिवदत्त नाईक (वय २८ वर्षे) हा बुडत असल्याचे जनार्दन सडेकर (वय ५५ वर्षे) यांच्या लक्षात येताच ते क्षणाचाही विलंब न करता त्याला वाचवण्यासाठी गेले.

सडेकर हे पट्टीचे पोहणारे होते; परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. शिवदत्तचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत हाती लागला नव्हता. उद्या, सोमवारी शोधमोहीम हाती घेतल्यानंतर मृतदेह हाती लागण्याची शक्यता आहे.

पर्यटक हजार, सुरक्षा रक्षक दोनच

वन खाते प्रत्येक पर्यटकाकडून 100 रुपये फी आकारते. शिवाय वाहन आत सोडण्यासाठी वेगळी फी घेतली जाते. मात्र, त्यांच्या सुरक्षेसाठी वन खाते कोणतीच उपाययोजना करत नाही. केवळ हंगामी पद्धतीने घेतलेले दोन सुरक्षा रक्षक हजारो पर्यटकांना कसे काय हाताळणार, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Two drowns at Mainapi Waterfall Netravali
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांत वाढ; दक्षिण गोव्यात किंमती स्थिर, जाणून घ्या आजचे दर

15 वर्षांपूर्वीही अशीच घटना

नेत्रावळीत मैनापी, सावरी, पाली, उदेंगी असे चार धबधबे असून येथे आतापर्यंत किमान 12 पर्यटक बुडून मरण पावल्याच्या घटना घडल्या आहेत.

यात सावरी धबधब्यावर सर्वाधिक पर्यटक बुडाले आहेत. मैनापी धबधब्यावर 15 वर्षांपूर्वी मडगाव येथील इंजिनिअरिंग कॉलेजचा विद्यार्थी बुडाला होता. त्याचा मृतदेह बराच काळ सापडला नव्हता.

Two drowns at Mainapi Waterfall Netravali
Deaths by Drowning in Goa: राज्यात वर्षभरात 36 जणांचा बुडून अंत; जुलै महिन्यात 6 जणांचा मृत्यू

लाईफ जॅकेट पुरवा !

पावसाळ्यात सुट्टीच्या दिवसांत अक्षरशः हजारो पर्यटक नेत्रावळीकडे धाव घेतात. मात्र, पर्यटकांसाठी वन खात्याने कोणत्याही सुरक्षात्मक सुविधा पुरवलेल्या नाहीत.

वन खाते येथे येणाऱ्या पर्यटकांकडून फी आकारते. त्यांनी निदान पर्यटकांना लाईफ जॅकेट पुरवावेत, अशी मागणी केली जात आहे.

यंत्रणा पोहोचली उशिरा

ही घटना समजताच मामलेदार गौरव गावकर, पोलिस निरीक्षक प्रवीण गावस, अग्निशमन दल, वनरक्षक यांनी घटनास्थळी धाव घेतली. ही दुर्घटना दुपारी १ वाजता घडली. परंतु ३ वाजेपर्यंत तेथे कोणीही आले नव्हते, असे प्रत्यक्षदर्शी देविदास पेडणेकर यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com