Deaths by Drowning in Goa: राज्यात वर्षभरात 36 जणांचा बुडून अंत; जुलै महिन्यात 6 जणांचा मृत्यू

28 पुरूष, 6 महिला, 2 मुलांचा समावेश
Deaths by Drowning in Goa
Deaths by Drowning in GoaDainik Gomantak
Published on
Updated on

Death by Drowning in Goa in 2023: मैनापी धबधब्यात दोघांचा बुडून मृत्यू झाल्यानंतर या वर्षी जुलै महिन्यात पहिल्या नऊ दिवसांताच राज्यात बुडून मृत्यू होणाऱ्यांची संख्या 6 वर गेली आहे. तर या वर्षात आत्तापर्यंत 36 जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

बुडून मृत्यू झालेल्या या 36 जणांमध्ये सर्वाधिक 28 पुरूष आहेत. सहा महिला आणि दोन मुलांचाही यात समावेश आहे.

Deaths by Drowning in Goa
Goa Petrol-Diesel Price: उत्तर गोवा, पणजीत पेट्रोल-डीझेल दरांत वाढ; दक्षिण गोव्यात किंमती स्थिर, जाणून घ्या आजचे दर

गोव्यात जानेवारी आणि फेब्रुवारीत प्रत्येकी चार जणांचा बुडून मृत्यू झाला होता. मार्चमध्ये तीन, एप्रिलमध्ये सहा जण, मे महिन्यात सात जण जूनध्ये सहा जण तर जुलैमध्ये आत्तापर्यंत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. असे या वर्षभरात बुडून एकूण 36 मृत्यू झाले आहेत. कुडचडे सांगे परिसरात सर्वाधिक 8 जणांचा मृत्यू झालेला आहे.

गोव्यात देशभरातून पर्यटक येत असतात. उन्हाळी पर्यटनासह पावसाळी पर्यटनासाठीही गोव्याबाहेरून पर्यटक येत असतात. बऱ्याचदा योग्य ती खबरदारी न घेतल्याने बुडून मृत्यू होण्याचे प्रकार घडत असतात.

काही वेळा मस्ती करण्याच्या नादात, सेल्फी घेण्याच्या नादात हे मृत्यू झालेले आहेत. बीचवर समुद्रात लाटांचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाले आहेत. केवळ समुद्रातच नाही तर नदी, तलावातही अशा घटना घडल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com