POP Ganesh Idol  Dainik Gomantak
गोवा

POP Ganesh Idol: गणेश मूर्तींमध्ये POP चा वापर? गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून चाचणी

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim,Goa

पणजी: दीड दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करंझाळे समुद्र किनाऱ्यावर तरंगणाऱ्या काही मूर्ती चाचणीसाठी पाठवण्यात आल्या आहे.

या गणेश मूर्तींमध्ये POP चा वापर झाला आहे का हे तपासण्यासाठी ही पाऊलं उचलली असल्याची माहिती गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली आणि चाचणीनंतर चार दिवसांत निकाल येईल असेही म्हणाले.

POP च्या वापरावर निर्बंध असून देखील काही गणेशमूर्ती विसर्जनानंतर किनारी तरंगताना दिसल्या. चतुर्थीच्या आधी गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून स्थानिक दुकानांमधून विक्री केल्या गेलेल्या मूर्तींची तपासणी केली गेली.

या तपासणीमधून उत्तर गोव्यात दोन तर दक्षिण गोव्यात POP पासून बनवलेली एक मूर्ती आढळली होती. मंडळाकडून संबंधित दुकानांची माहिती पुढील तपासासाठी कलेक्टरकडे पाठवण्यात आली होती.

या सर्व प्रयत्नानंतर देखील विसर्जनानंतर दोन गणेशमूर्ती करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर तरंगताना दिसल्या आणि म्हणूनच आता पुढील तपास सुरु झाला आहे.

अध्यक्ष महेश पाटील यांच्या मतानुसार गोव्यातील विक्रेत्यांकडून POP मूर्तींची विक्री केली जात नाही, मात्र काही परप्रांतीय विक्रेते चतुर्थी तोंडावर असताना ही विक्री करतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa PWD: सार्वजनिक बांधकाम खात्यातील कर्मचारीच असुरक्षित; खाते लोकांना काय सुरक्षा देणार? पाटकरांचा सवाल

गोवा सरकारची तिजोरी रिकामी, म्हणून EV Subsidy मिळण्यास होतोय विलंब; काँग्रेसचा आरोप

Goa Today's News Live: माडेल-मडगाव येथे घरफोडी, १ लाख रुपयांचा ऐवज लंपास

कॅसिनोमुळे वेश्‍‍या व्‍यवसाय, दारु या वाईट वृत्ती फोफावतात; सनबर्ननंतर दक्षिण गोव्‍यात आता कॅसिनोला विरोध

खाणव्याप्त भागातील ट्रक धारकांसाठी महत्वाची बातमी; ट्रकांचा ‘फिटनेस' दंड गोवा सरकारकडून रद्द

SCROLL FOR NEXT