Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: मये मतदारसंघात कार्यकर्त्यांना धमक्या, 'गोवा फॉरवर्ड'चा आरोप; सत्ताधारी भाजपवर साधले शरसंधान

Goa ZP Election: सत्ताधारी भाजपने ‘गोवा फॉरवर्ड''चा धसका घेतला असून, मये मतदारसंघातील कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते प्रा. राजेश कळंगुटकर यांनी केला आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: सत्ताधारी भाजपने ‘गोवा फॉरवर्ड''चा धसका घेतला असून, मये मतदारसंघातील कार्यकर्त्यांना धमकावण्याचे प्रकार घडत आहेत, असा आरोप गोवा फॉरवर्डचे कार्यकर्ते प्रा. राजेश कळंगुटकर यांनी केला आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीतून मये मतदारसंघात निश्चितच राजकीय बदल दिसून येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा पंचायतीच्या मये मतदारसंघातील काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीच्या उमेदवार प्रा. राधिका कळंगुटकर यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना प्रा. राजेश कळंगुटकर यांनी बोलताना भाजपच्या मयेतील २५ वर्षांच्या राजवटीला कंटाळली आहे. असे सांगून यावेळी बदल घडवून आणण्यासाठी मतदार सज्ज असल्याचे सांगितले.

भाजपला सर्वसामान्य जनतेचे काहीच पडलेले नाही. असेही ते म्हणाले. यावेळी गोवा फॉरवर्डच्या उमेदवार प्रा. राधिका कळंगुटकर, गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस दुर्गादास कामत, संतोषकुमार सावंत, मये गट अध्यक्ष वीरेंद्र पत्रे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा. राधिका कळंगुटकर या युतीच्या उमेदवार असून, कार्यकर्त्यांची धडपड पाहता त्यांना विजयाची अधिक संधी आहे, असा विश्वास दुर्गादास कामत यांनी व्यक्त केला. निवडून आल्यानंतर मतदारांच्या अपेक्षा पूर्तीसाठी मी कार्यरत राहणार, अशी ग्वाही प्रा. राधिका कळंगुटकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT