Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: फोंड्यातील समीकरणे बदलण्याचे संकेत, भाटीकरांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपसमोर आव्हान; मोर्चेबांधणी सुरू

Goa Politics News: डॉ. केतन भाटीकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे फोंडा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत.

Sameer Amunekar

फोंडा: डॉ. केतन भाटीकर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे फोंडा मतदारसंघातील समीकरणे बदलण्याचे संकेत मिळत आहेत. फोंडा पोटनिवडणुकीकरिता भाटीकर यांना काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी प्रवेशानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहिलेली काँग्रेसची नेतेमंडळी पाहिली तर भाटीकर यांनाच उमेदवारी निश्चित मानली जात आहे. भाटीकरांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले असून भाजप आता कोणती रणनीती आखतो याकडे अनेकांचे लक्ष आहे.

दिवंगत रवी नाईक काँग्रेसमध्ये असताना फोंडा हा काँग्रेसचा बालेकिल्ला गणला जात असे. चार निवडणुकांत रवींनी काँग्रेसच्या उमेदवारीवर या मतदारसंघातून विजय प्राप्त केला होता. २०१२ साली मात्र रवींना पराभवाचे तोंड पाहावे लागले. २०२२ साली रवी भाजपमध्ये आल्यानंतर निसटत्या फरकाने ते विजयी झाले. मगोचे केतन भाटीकर हे दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसचे राजेश वेरेकर हे तिसऱ्या क्रमांकावर होते.

रवींच्या निधनामुळे फोंड्यात पोटनिवडणूक होत असून रवी नसल्यामुळे भाजपची कसोटी लागण्याची शक्यता आहे. भाटीकरांच्या काँग्रेस प्रवेशामुळे भाजपवर दडपण वाढले आहे. भाजपच्या उमेदवारीसाठी रवी नाईक पुत्र रितेश व भाजपचे दक्षिण गोव्याचे सचिव विश्वनाथ दळवी यांची नावे चर्चेत आहेत. दोघांनीही आपल्या कार्याला सुरुवात केली आहे. आप व आरजीची भूमिका अजून तरी स्पष्ट झालेली नाही.

रवींची उणीव...?

दिवंगत रवी नाईक हे फोंडा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आले होते. आता ते हयात नसल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या अनुभवाची उणीव प्रकर्षाने जाणवत असल्याचे दिसत आहे.

रितेशचे नाव आघाडीवर?

रितेश नाईक व विश्वनाथ दळवी ही दोन नावे जरी भाजपच्या उमेदवारीच्या कार्डावर असली तरी रितेशचे नाव आघाडीवर असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते, असे या सूत्राने सांगितले.|

‘भाटीकर तुमच्या दारी?’

काँग्रेस प्रवेशावेळी जाहीर केल्याप्रमाणे केतन भाटीकर यांनी ''भाटीकर तुमच्या दारी'' या उपक्रमाखाली लोकांना भेटण्यास सुरुवात केली असल्याचे कळते.

सिद्धार्थ कुंकळकर निवडणूक इन्चार्ज?

पणजीचे माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर यांना फोंडा पोटनिवडणुकीकरिता भाजपचे 'इन्चार्ज' म्हणून नियुक्ती केल्याची माहिती प्राप्त झाली असून काही मंत्र्यांकडेही फोंडा मतदारसंघातील विविध भागांची जबाबदारी दिली असल्याचे कळते. यातून भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचे स्पष्ट होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT