Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: निवडणुकीपूर्वीच प्रतिमा विरुद्ध वालंका सामना? नावेलीत उमेदवारीवरून चुरस; सिप्रू कार्दोझ यांच्या नावाचीही चर्चा

Navelim Constituency: निवडणुकीत नावेली मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच समाजकार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे तेथे राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: येत्या विधानसभा निवडणुकीत नावेली मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच समाजकार्यकर्त्या प्रतिमा कुतिन्हो यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे तेथे राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच वालंका आलेमाव आणि प्रतिमा कुतिन्हो यांच्यात उमेदवारीवरून राजकीय चुरस निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नावेलीतून काँग्रेसची उमेदवारी वालंका आलेमाव यांना मिळावी, यासाठी माजी मुख्यमंत्री चर्चिल आलेमाव प्रयत्नशील आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी गेल्या महिन्यात दिल्ली येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर राजकीयदृष्ट्या सकारात्मक संकेत मिळाल्याची प्रतिक्रिया चर्चिल यांनी दिली होती.

मात्र, प्रतिमा कुतिन्हो यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर नावेलीत काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोण असेल, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. सोशल मीडियावरही दोन्ही गटांतील समर्थकांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

प्रतिमा कुतिन्हो यांनी ‘गोमन्तक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत, नावेलीत पुन्हा काँग्रेसचा झेंडा फडकावा हा एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण पक्षात प्रवेश केल्याचे सांगितले. मात्र, आपला काँग्रेस प्रवेश कोणत्याही अटी किंवा शर्थींशिवाय झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, नावेलीतील माजी जिल्हा पंचायत सदस्य सिप्रू कार्दोझ यांनीही यापूर्वीच विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

निवडणुका पैशांनी जिंकता येत नाहीत

वालंका आलेमाव यांचे नाव न घेता टीका करताना प्रतिमा म्हणाल्या, मी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतरही नावेलीतील सामाजिक काम सुरूच ठेवले. मात्र, आता निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्यांनी गेल्या चार वर्षांत मतदारसंघासाठी काय काम केले, याचे उत्तर द्यावे. निवडणुका केवळ पैशांच्या जोरावर जिंकता येत नाहीत, त्यासाठी जनतेचा विश्वास आणि पाठिंबा आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT