Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'विरोधकांनी भ्रमात राहू नये', 'नरकासुर' संबोधल्यानंतर CM प्रमोद सावंतांचा जोरदार पलटवार

CM Pramod Sawant: दिवाळीच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारवर केलेल्या टीकेची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तात्काळ दखल घेत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: दिवाळीच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी सरकारवर केलेल्या टीकेची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तात्काळ दखल घेत त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री सावंत यांनी कडक शब्दांत विरोधकांना फटकारले.

फातोर्डा येथील श्रीकृष्ण विजयोत्सवाच्या व्यासपीठावर गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई, काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षाचे मनोज परब यांच्यासह या तिन्ही पक्षांच्या मुख्य नेत्यांनी एकत्रित येऊन त्यांनी नव्या युतीची झलक दाखविली होती. यावेळी विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून सत्ताधारी भाजप तथा सरकारातील आमदारांना नरकासुराची उपमा दिली होती.

वरून त्यावर मुख्यमंत्र्यांनी आज जोरदार पलटवार केला. पणजीतील एका कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्र्यांना फातोर्डा येथील कार्यक्रमात सरकारवर झालेल्या टीकेवरून पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी उत्तर दिले.

फातोर्डा येथील श्रीकृष्ण विजयोत्सवाच्या व्यासपीठावरून काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भाजप सरकारवर आसूड ओढले. त्यांनी सत्ताधारी भाजपच्या आमदारांना ‘३३ नरकासुर’ अशी उपमा दिली. यावेळी काँग्रेस-गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्सचे नेतेही उपस्थित होते. त्यामुळे सरकारवर झालेल्या टीकेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे.

‘त्या’ टीकेवर मुख्यमंत्री म्हणाले, की ‘जर तुम्ही स्वतःला देव समजून आम्हाला ‘नरकासुर’ ठरवत असाल तर भ्रमात राहू नका. आम्ही कोणत्याही भ्रमात राहात नाही. आम्ही जनतेचे ‘सेवक’ आहोत. गोव्यातील जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे. गोव्यासाठी जे करणे गरजेचे आहे, ते आम्ही केले आणि यापुढेही करत राहू.’ असे मुख्यमंत्र्यांनी ठणकावून सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Inspiring Video: 'शिकण्याची जिद्द' याला म्हणतात! शाळेत जाणाऱ्या आजीबाईंचा व्हिडिओ व्हायरल, नेटकरी म्हणाले, "एक नंबर..."

Goa ZP Election: जि.पं. आरक्षणावर मंगळवारी सुनावणी, राज्य निवडणूक आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस

Horoscope: तुमचे नशीब उजळणार! व्यवसायात भरभराट! 'या' 4 राशींसाठी 17 नोव्हेंबरपासून चांगले दिवस

IPL 2026: कोलकाता नाईट रायडर्समध्ये 'महाबदल'! आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यरसह 9 स्टार खेळाडूंना नारळ

Pimpal Tree: शेकडो वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने लावलेला, मोंहेजदाडो,- हडप्पा काळापासून सापडणार सर्वात प्राचीन वृक्ष 'पिंपळ'

SCROLL FOR NEXT