पणजी: दिवाळीच्या उत्साहादरम्यान गोव्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला फातोर्डा येथील एका विरोधी पक्षांच्या मेळाव्यात सत्ताधारी भाजप पक्षाला 'नरकासुर' संबोधले गेले होते. या धारदार टीकेवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अत्यंत आक्रमकपणे आणि सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले आणि सोबतच त्यांनी विरोधकांना 'भ्रमात' न राहण्याचा सल्ला दिला आहे.
काँग्रेसचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी फातोर्डा येथे आयोजित श्रीकृष्ण विजयोत्सवाच्या व्यासपीठावरून भाजपला लक्ष्य करताना '३३ नरकासुर' अशी उपमा दिली होती. विरोधी पक्षांनी एकत्र येत गोव्याला या 'नरकासुरां'पासून वाचवण्याची शपथ घेतली होती. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, "जर तुम्ही स्वतःला 'देव' समजत असाल आणि आम्हाला 'नरकासुर' म्हणत असाल, तर या भ्रमात राहू नका."
ते पुढे म्हणाले की, "आम्ही कोणत्याही भ्रमात राहत नाही. आम्ही 'सेवक' आहोत. गोव्याच्या जनतेने आम्हाला सेवा करण्याची संधी दिली आहे आणि गोव्यासाठी जे करणे आवश्यक होते, ते आम्ही केले आहे आणि यापुढेही करत राहू." डॉ. सावंत यांनी त्यांच्या वक्तव्यातून भाजप लोकांचे प्रतिनिधित्व करणारा 'सेवक' पक्ष आहे, तर विरोधक सत्तेसाठी धडपडणारे 'भ्रमग्रस्त' असल्याचा अप्रत्यक्ष संदेश दिला आहे.
फातोर्डा येथील विरोधी पक्षांच्या मेळाव्याला 'आप' गैरहजर का, या प्रश्नावर पालेकर यांनी खुलासा केला. ते म्हणाले, "२ ऑक्टोबरच्या दोन आठवड्यांपूर्वीच आम्ही सांगितले होते की, आम्ही आघाडीसाठी तयार आहोत, पण त्यासाठी सर्वांनी एकत्र यावे लागेल. पण, त्यांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला नाही. मेळाव्याच्या दिवशी आम्हाला बोलावण्यात आले नव्हते."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.