Goa police crime news  Dainik Gomantak
गोवा

Goa Biggest Drug Bust: 43 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त; गोवा पोलिसांची आजवरची सर्वात मोठी कारवाई

Drug seizure Goa: याप्रकरणातील आरोपींची सखोल चौकशी करुन याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलिस करत आहेत. तसेच, यात आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे.

Pramod Yadav

मुरगाव: गोवा पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात आजवरजी सर्वात मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिकोळणा, मुरगाव येथे 4.325 किलो वजनाचे 43.20 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले असून, याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

निबू व्हिन्सेंट, रेश्मा वाडेकर आणि मंगेश वाडेकर असे अटक करण्यात आलेल्या तीन जणांची नावे आहेत. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चिकोळणा, मुरगाव येथे छापा टाकून 4.325 किलो वजनाचा कोकेन हा अमली पदार्थ जप्त केला. या अमली पदार्थाची बाजारातील किंमत 43.20 कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. गोवा पोलिसांची आजवरची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

याप्रकरणातील आरोपींची सखोल चौकशी करुन याचे धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न सध्या पोलिस करत आहेत. तसेच, यात आणखी कोणाचा समावेश आहे का? याचा देखील शोध घेतला जात आहे. दरम्यान, पर्यटनाचा हॉटस्पॉट असलेला गोवा अमली पदार्थ तस्करीसाठी देखील तस्करांच्या यादीत टॉपवर असतो. राज्यातील अमली पदार्थ तस्करीला आळा घालणे पोलिसांसमोरील मोठे आव्हान बनले आहे.

गिरीत ११.६७ कोटी रुपयांचा गांजा जप्त केला होता जप्त

गेल्या महिन्यात (०८ मार्च) गिरी येथे तब्बल ११.६७ कोटी रुपये किंमतीचा उच्च दर्जाचा गांजा जप्त करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही कारवाई करत एका तरुणाला अटक केली होती. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देखील या कारवाईची दखल घेत पोलिसांचे कौतुक केले होते. दरम्यान, एक महिन्याच्या कालावधीत दुसरी सर्वात मोठी कारवाई करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT