Sattari Crime: हनुमान मंदिराजवळ आढळला 24 वर्षीय तरुणाचा मृतदेह; खुनाचा संशय, नगरगावात खळबळ

Valpoi Murder Case: श्रवणच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यास मदत होणार आहे.
Suspicion of murder after young man found dead in Sattari
Sattari murder caseDainik Gomantak
Published on
Updated on

वाळपई: अंबेडे, नगरगाव येथे हनुमान मंदिराजवळ २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. श्रवण बर्वे असे या तरुणाचे नाव असून, त्याचा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सोमवारी (१४ एप्रिल) हा प्रकार उघडकीस आला.

श्रवण बर्वेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत अंबेडे, नगरगाव येथील हनुमान मंदिराजवळ स्थानिकांना आढळून आला. स्थानिकांनी संबधित घटनेचे माहिती तत्काळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी खुनाचा संशय व्यक्त केला असून, पोलिसांनी या दिशेने तपास करण्यास सुरुवात केली आहे.

Suspicion of murder after young man found dead in Sattari
Drishti Marine: किनाऱ्यावरचे 'खरे नायक', दृष्टी मरीनच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांत आठ जणांना बुडण्यापासून वाचवलं

श्रवणचा मृतेदह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ निर्माण झाली. श्रवणच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नसून, पोलिस सर्व शक्यता तपासून पाहत असल्याची माहिती मिळाली आहे. श्रवणच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यास मदत होणार आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com