Nilesh Cabral Dainik Gomantak
गोवा

Goa News: नोव्हेंबरमध्ये रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण- नीलेश काब्राल

Goa News: निकृष्ट दर्जाचे काम होणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

दैनिक गोमन्तक

Goa News: राज्यात हॉटमिक्सिंग केलेले रस्ते अवघ्या दोन महिन्यांत वाहून जाण्याचे प्रकार घडल्यानंतर सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी कंत्राटदारावर कारवाई केली होती. परंतु पावसाळा सुरू असल्याने हॉटमिक्सिंगचे काम पूर्ण करता न आल्यामुळे नोव्हेंबरमध्ये केले जाईल.

तसेच, निकृष्ट दर्जाचे काम होणार नाही याची दक्षता घेतली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्ता विभागाचे मुख्य अभियंता दिनेश गुप्ता यांनी ‘दै.गोमन्तक’ला दिली. ऐन पावसाळ्यात रस्त्यांवरील हॉटमिक्स वाहून जाण्याचा प्रकार घडल्याने त्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करून रस्ते दुरुस्त करून घेण्याचे काम सुरू झाले होते.

परंतु पावसामुळे ते पूर्ण करणे शक्य झाले नाही. पावसात ओलावा असल्याने डांबर घट्टपणे चिकटणे अवघड होते, त्यामुळे रस्त्याचे काम हे निकृष्ट होण्याची शक्यता निर्माण होते. परिणामी रस्ता लगेच खराब होण्याचे प्रकार घडतात. सावधगिरी म्हणून पावसाळा संपल्यानंतर काम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.

कर्नल मिलिंद प्रभू, तज्ज्ञ-

रस्ता बनवताना एक विशिष्ट प्रक्रिया असते, ती योग्यरीत्या केल्यास रस्ता कुठल्याही हवामानात खराब होत नाही. युरोपमध्ये कधीही पाऊस पडतो, परंतु त्यामुळे त्यांचे रस्ते खराब होत नाहीत. यामागचे कारण म्हणजे योग्य प्रक्रियेचे पालन केले जाते.

तसेच रस्त्यावर पाणी साचणार नाही यासाठी गटार व्यवस्था केली गेली आहे. गोव्यात सुमारे चार महिने पाऊस पडत असल्याने येथे रस्त्याच्या बाजूला गटार व्यवस्था सुरळीत असण्याची आवश्‍यकता आहे. मात्र, ही व्यवस्था न केल्याने आज आपले रस्ते लगेच खराब होतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT