Goa Culture: साखळीत '7' नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव

Goa Culture: त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे नौकानयन स्पर्धा असते.
Goa Culture | Tripurari Purnima Festival
Goa Culture | Tripurari Purnima FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Culture: साखळी येथे 7 नोव्हेंबर रोजी भव्य त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने राज्यस्तरीय समितीचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत संपूर्ण तयारीचा आढावा घेण्यात आला.

त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे नौकानयन स्पर्धा. कोविडमुळे गेली दोन वर्षे हा उत्सव होऊ शकला नव्हता. कला व संस्कृती संचालनालय संचलित गोवा पर्यटन खाते, पर्यटन विकास महामंडळ आणि माहिती खात्याच्या सहकार्याने दीपावली उत्सव समिती विठ्ठलपूर सांखळी हा उत्सव राज्यस्तरीय पातळीवर साजरा करणार आहेत.

Goa Culture | Tripurari Purnima Festival
Goa Tourism: ''ब्रिटन - भारत ई-व्हिसा समस्या लवकरच सुटेल''

तसेच, या बैठकीस मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे हे उपस्थित होते तसेच गोवा पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन गणेश गावकर, माहिती संचालक, पोलीस अधिकारी, सांखळीचे नगराध्यक्ष, कारापूर सर्वणचे सरपंच, पंच, सार्वजनिक बांधकाम, वीज तसेच अन्य खात्यांचे अधिकारी तसेच दीपावली उत्सव समितीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

35 हजारांचे प्रथम पारितोषिक

नौकानयन स्पर्धेसाठी प्रथम रु. 35 हजारचे पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक रु. 30 हजार, तृतीय रु. 25 हजार, चतुर्थ रु. 20 हजार, पाचवे रु. 15 हजार याशिवाय रु. 8 हजारची 5 उत्तेजनार्थ पारितोषिके जाहीर केली आहेत.

Goa Culture | Tripurari Purnima Festival
Goa Electricity: गोव्यात वीज खात्याकडून पथदीपांचा भार सामान्य ग्राहकांवर

तसेच, या व्यतिरिक्त रु. 5 हजारची 10 विशेष पारितोषिके देण्यात येणार असून बक्षिसे मिळालेली नाहीत अशा सहभागी पथकांना रु. 4 हजारचे मानधन देण्याचा निर्णय राज्य पातळीवर झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

लक्षवेधी नौकांचे दर्शन

त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाचे खास आकर्षण म्हणजे विठ्ठलपूर साखळीच्या वाळवंटी नदीमध्ये नौका स्पर्धा. छोट्या छोट्या आकर्षक व डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या नौकांचे दर्शन घेण्यासाठी गोव्याच्या विविध भागातून हजारो नागरिक साखळीत येत असतात. नौका स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी समीर देसाई यांच्याशी संपर्क साधावा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com