Goa Traffic Update Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Update: बीच सेलिब्रेशनसाठी गोव्याला चाललाय? वाहतूक नियमांत मोठा बदल; पार्किंग, पर्यायी रस्त्यांची माहिती घ्या एका क्लिकवर..

Goa Traffic Rules: सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ चे स्वागत करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची अलोट गर्दी लक्षात घेता, गोवा वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा जाहीर केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सरत्या वर्षाला निरोप देऊन २०२६ चे स्वागत करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची अलोट गर्दी लक्षात घेता, गोवा वाहतूक पोलिसांनी विशेष वाहतूक आराखडा जाहीर केला आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी रोजी होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कळंगुट, बागा, वास्को, कोलवा आणि काणकोण या महत्त्वाच्या पर्यटन क्षेत्रांत वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत.

कळंगुट आणि बागा परिसरात पर्यटकांचा सर्वाधिक ओघ असल्याने येथे विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भारत जंक्शन ते टिटोज सर्कल (स्नो पार्क मार्गे) हा रस्ता दुपारी ३ ते सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे.

तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी अनेक अंतर्गत रस्ते ‘वन-वे’ करण्यात आले आहेत. ३१ जानेवारी २०२६ पर्यंत कळंगुट परिसरात मोठ्या पर्यटक बसेस आणि मिनी बसेसच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच या परिसरासाठी पर्यटकांच्या चारचाकी वाहनांसाठी १५ तात्पुरती पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली आहेत.

३१ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ ते १ जानेवारी पहाटे ३ वाजेपर्यंत वास्को बोगमाळो चर्च ते समुद्राकडे जाणारा रस्ता दुचाकी वगळता इतर सर्व वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. चारचाकी वाहन जेएनसी वियरानगर आणि कोस्ट गार्ड कॅम्पस मार्गे वळविण्यात आली आहे.

कोलवा सर्कल ते किनारा जड वाहतूक बंद

कोलवा येथील ला बेन रिसॉर्ट ते किनारी भागात पार्किंगकडे जाणारा रस्ता चारचाकी वाहनांसाठी बंद असेल. या वाहनांना सी पर्ल हॉटेल मार्गे वळवण्यात आले आहे. कोलवा सर्कलवरून जड वाहनांना समुद्रकिनाऱ्याकडे जाण्यास बंदी असेल. काणकोण पालिकेच्या सहकार्याने साई फॅमिली रेस्टॉरंट, देवबाग क्रीडा संकुल, पाळेले क्लब आणि रायशेत भातशेती परिसर येथे तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT