Konkan Tourism: गोव्याची क्रेझ संपली? पर्यटकांची पावलं आता कोकणाकडे; सिंधुदुर्ग, रत्नागिरीचे किनारे 'हाऊसफुल्ल'

Konkan Tourism News: सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी आता गोव्याऐवजी कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीला अधिक पसंती दिली आहे.
Konkan Tourism
Konkan TourismDainik Gomantak
Published on
Updated on

सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पर्यटकांनी आता गोव्याऐवजी कोकणच्या निसर्गरम्य किनारपट्टीला अधिक पसंती दिली आहे. नाताळच्या सुट्ट्यांचे निमित्त साधून राज्यभरातून हजारो पर्यटक कोकणात दाखल झाले असून, विशेषतः ; सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. स्वच्छ समुद्रकिनारे, हिरवेगार निसर्गसौंदर्य आणि कोकणी पाहुणचार यामुळे कोकण सध्या पर्यटनाचे मुख्य केंद्र बनलं आहे.

पर्यटकांचा महापूर

शिरोडा, मालवण, श्रीवर्धन आणि दिवेआगर परिसरातील समुद्रकिनाऱ्यांवर सध्या जत्रेसारखे स्वरूप प्राप्त झाले आहे. अनेक पर्यटकांनी यंदा गर्दीच्या गोव्याला बगल देऊन कोकणातील शांत आणि कौटुंबिक वातावरणाची निवड केली आहे.

कोकणतील सर्वच किनारे पर्यटकांनी फुलून गेले असून, सकाळपासूनच पर्यटकांची गर्दी पाहायला मिळतेय. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर शेजारील राज्यांमधूनही मोठ्या संख्येने लोक येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी येत आहेत.

वॉटर स्पोर्ट्सचा थरार

मालवण, दिवेआगर, निवतीच्या किनाऱ्यावर सध्या जलक्रीडांचा (Water Sports) आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे. पॅरासेलिंगच्या माध्यमातून निळ्याशार समुद्राचे दर्शन घेणे असो किंवा जेट स्की आणि बोट राईडचा थरार पर्यटकांना अनुभवायसा मिळतोय. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे स्थानिक वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पर्यटन व्यवसायाला मोठी उभारी मिळाली आहे.

Konkan Tourism
Goa Crime: एका क्षणाचा राग अन् संसाराची राखरांगोळी! नवऱ्याशी भांडण होताच बायकोनं संपवली जीवनयात्रा; धक्कादायक घटनेनं हादरलं सांकवाळ

पर्यटकांच्या या प्रचंड ओघामुळे रायगडमधील बहुतांश रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि होमस्टेचे बुकिंग पूर्ण झाले आहे. अनेक पर्यटकांना राहण्यासाठी जागा मिळवणे कठीण झाले असून, महिनाभर आधीच बुकिंग केलेल्यांनाच प्राधान्य मिळत आहे.

Konkan Tourism
Goa Politics: त्यांची अवस्था 'ना घर का ना घाट का'! मंत्री ढवळीकरांची RGP वर टीका, Watch Video

कोकणातील घरगुती 'होमस्टे'ला पर्यटकांची सर्वाधिक पसंती मिळत असून, यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे. स्थानिक हॉटेल व्यावसायिक, रिक्षा चालक आणि हस्तकला विक्रेते यांच्या व्यवसायात मोठी वाढ झाली असून, कोकणात सध्या खऱ्या अर्थाने 'पर्यटन पर्व' सुरू झाल्याचे चित्र आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com