Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

New Year Celebration: २०२५ या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत.
Konkan Tourism
Konkan TourismDainik Gomantak
Published on
Updated on

२०२५ या वर्षाला निरोप देऊन २०२६ या नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. नवीन वर्षाची सुरुवात निसर्गाच्या सानिध्यात आणि समुद्राच्या फेसाळणाऱ्या लाटांच्या साक्षीने करण्यासाठी महाराष्ट्रातील पर्यटकांची पहिली पसंती नेहमीच 'कोकण' राहिली आहे. हिरवागार निसर्ग, निळाशार समुद्र आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांचा वारसा लाभलेल्या कोकणात यंदा पर्यटकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. तुम्हीही जर सहलीचा प्लॅन करत असाल, तर तुमच्यासाठी काही खास ठिकाणांची माहिती खालीलप्रमाणे आहे.

'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाणारे दापोली हे ठिकाण थंड हवेसाठी आणि सुंदर किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील मुरुड आणि कर्दे समुद्रकिनारे पर्यटकांना भुरळ घालतात.

दुसरीकडे, जर तुम्हाला स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्कलिंगची आवड असेल, तर मालवण हे तुमच्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. मालवणचा ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला आणि येथील चविष्ट 'मालवणी जेवण' तुमच्या सहलीची मजा द्विगुणित करेल. नवीन वर्षाच्या रात्री इथल्या समुद्रकिनाऱ्यावर होणारी आतषबाजी पाहण्यासारखी असते.

Konkan Tourism
Goa ZP Elections: उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; रेश्मा बांदोडकर आणि नामदेव च्यारी रिंगणात

गर्दीपासून दूर आणि एकांत शोधणाऱ्या लोकांसाठी 'निवती'चा किनारा हा एखाद्या छुप्या खजिन्यासारखा आहे. निवतीचा पांढरा शुभ्र वाळूचा किनारा आणि तिथले निळे पाणी पाहून तुम्ही परदेशात असल्याचा भास होईल.

ऐतिहासिक वारसा जपणाऱ्यांसाठी 'विजयदुर्ग किल्ला' हे एक उत्तम ठिकाण आहे. तीन बाजूंनी समुद्राने वेढलेला हा जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख केंद्र होते. नवीन वर्षाच्या निमित्ताने किल्ल्याच्या परिसरात फिरणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरू शकतो.

Konkan Tourism
Goa Zilla Panchayat: उत्तर, दक्षिण गोवा जिल्‍हा पंचायत अध्यक्ष उपाध्‍यक्षांची नावे जाहीर; 7 जानेवारीला घेणार पदांचा ताबा

रत्नागिरी, सिंधुदुर्गातील किनारे

रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे, आरे-वारे आणि मांडवी किनारे पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहेत. रत्नागिरीतील समुद्रकिनारे हे स्वच्छ आणि प्रशस्त असून तिथे सूर्यास्ताचा आनंद घेणे ही एक वेगळीच अनुभूती असते.

थंडीचा कडाका आणि समुद्राची गाज अशा वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत करणे ही पर्यटकांसाठी मोठी पर्वणी ठरेल. नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेलमध्ये खास कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com