MLA Elena Saldhana and college office bearers lighting lamps on the occasion of MES Golden Jubilee (Goa)
MLA Elena Saldhana and college office bearers lighting lamps on the occasion of MES Golden Jubilee (Goa) Dainik Gomantak
गोवा

Goa: मुरगाव 'एमइएस' ला ५० वर्षे पूर्ण...

Dainik Gomantak

Goa: वास्को येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांची शिक्षणाची गरज लक्षात घेऊन स्वर्गीय वसंतराव (अण्णा) जोशी यांनी सुरू केलेल्या मुरगाव एज्युकेशन सोसायटीला (MES) आज पन्नास वर्षे पूर्ण (Golden Jubilee Year) झाली आहे. आजपर्यंत या संस्थेला समाजातून परिपूर्ण व भरीव आधार व समर्थन मिळाल्याने या संस्थेने शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. या सोसायटीच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समाजातील प्रत्येक घटकाने मदत व सहकार्य घेण्यासाठी कार्यरत राहावे असे प्रतिपादन मुरगाव शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष (MES President) प्राचार्य श्री माधवराव श्रीनिवास कामत यांनी केले.

MLA Elena Saldhana expressing her thoughts on the occasion of MES Golden Jubilee (Goa)

मुरगाव शैक्षणिक संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राचार्य माधवराव कामत बोलत होते. विद्यालयाच्या आवारात आयोजित या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाच्या प्रसंगी कुठ्ठाळी मतदार संघाच्या आमदार श्रीमती एलिना साल्ढाणा (MLA Alina Saldhana), मुरगाव शैक्षणिक संस्थेचे उपाध्यक्ष सर्वस्वी परेश जोशी, भास्कर नायक, संस्थेच्या खजिनदार श्रीमती ललिता जोशी, जोशी कुटुंबातील प्रशांत जोशी, सुवर्ण बांदेकर, एमईएस महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. मीनाक्षी बाबा व इतर मान्यवर उपस्थित होते.

300 विद्यार्थी घेऊन एमईएस महाविद्यालयात 2000 विध्यार्थी शिकत आहेत

पन्नास वर्षांपूर्वी या संस्थेने कला आणि वाणिज्य शाखेत सुमारे ३०० विद्यार्थी घेऊन एमईएस महाविद्यालय वास्को येथील जोशी ईमारतीत सुरू केले होते. आज या महाविद्यालयाचा वटवृक्ष होऊन झुआरीनगर येथील सुसज्ज अशा इमारतीत दोन हजारापेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आज येथे कला तसेच वाणिज्य शाखे सोबत बीबीए, बी बीए (शिपींग), बीसीए, एम कॉम, पीएच सेंटर, उच्च माध्यमिक विद्यालयात कला, वाणिज्य, विज्ञान व व्यवसायिक अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. मागील ५० वर्षात या संस्थेने भरीव व कौतुकास्पद कामगिरी करून वास्को येथील गरीब व गरजू विद्यार्थ्यांची सोय केली आहे, असे श्री कामत यांनी सांगितले.

पुढील वर्षापासून गोव्यातील शिक्षण, साहित्य, कला, समाजसेवा, व्यवसाय इंडस्ट्री व इतर क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या "अभिमान श्री" पुरस्कार देण्याची घोषणा

स्व. वसंतराव जोशी यांनी वास्को येथील आणखी अकरा लोकांच्या सहकार्याने वास्को पंचक्रोशीतील गरजू गरीब मुलांना शिक्षण देण्याच्या उद्देशाने ही शैक्षणिक संस्था सुरू केली होती. श्री अण्णा जोशी स्वतः लोकांच्या घरी जाऊन मुलांना शिक्षण घेण्यासाठी विनंती करीत होते. पालकांनीही त्यावेळी मुलांना नवीन सुरू केलेल्या महाविद्यालयात पाठवण्यास रस दाखविला. आज या महाविद्यालयातून शैक्षणिक शिक्षण घेऊन गेलेले विद्यार्थी जगातील मोठ-मोठ्या आस्थापनात, बँकेत व इतरत्र अधिकारपदी आरूढ झाले आहेत, असे कामत यांनी सांगितले. एमईएस महाविद्यालयाचे पाच ते सहा विद्यार्थी गोवा राज्याचे मंत्रीही झालेत. यात राजेंद्र आर्लेकर हे हिमाचल प्रदेशाचे विद्यमान राज्यपाल आहेत . व्यवसायिक आनंद बोस, साहित्यिक विष्णू सूर्या वाघ, फिल्म निर्देशक लक्ष्मीकांत शेटगावकर, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, पाँडिचेरी सरकार महाविद्यालयाच्या डीन डॉ. नंदिता शिंक्रे, वर्ल्ड बँकेचे आनंद चटर्जी, मायक्रोसॉफ्टचे आल्वारू दियेश अशा कित्येक एमईएसच्या विद्यार्थ्यांनी गरुड झेप घेतली आहे ,असे कामत म्हणाले. संस्थेचे उच्च माध्यमिक विद्यालयीन व विद्यापीठ स्तरावरील अभ्यासक्रम कार्यरत असून संस्थेचा के.जीटू. पी.जी. (KG to PG) असा मोठा प्रकल्प सुरू करण्याचा मानस यावेळी प्राचार्य माधव कामत यांनी बोलून दाखविला. आजचा दिवस २३ ऑगस्ट हा दरवर्षी फाउंडर्स डे (स्थापना) दिवस म्हणून मोठ्या दिमाखाने साजरा करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली. त्याच प्रमाणे संस्थेतर्फे पुढील वर्षापासून गोव्यातील शिक्षण, साहित्य, कला, समाजसेवा, व्यवसाय इंडस्ट्री व इतर क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या "अभिमान श्री" पुरस्कार देण्याची घोषणा श्री कामत यांनी यावेळी केली. याच प्रमाणे शिक्षकांसाठी 'शिक्षक दिन' साजरा करणार असल्याचेही जाहीर केले. (Abhimaan Shree )

याप्रसंगी एमईएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. हरिश्‍चंद्र नागवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना स्व. अण्णा जोशी यांची पुण्याई या संस्थेला लाभली आहे. या संस्थेने आतापर्यंत कित्येक उत्कृष्ट नागरिक घडवले आहे. जीवनाचे मुख्य या संस्थेने लोकांना दिले आहे. त्यांनी एमईएस कॉलेज ही गोव्यातील एक उत्कृष्ट कॉलेज आहे. या कॉलेजात मी २७ वर्षे वेगवेगळ्या हुद्यावर विद्यादान केल्याने त्याचा फक्त गर्व असल्याचे ते म्हणाले.

अण्णांच्या दुरदृष्टीमुळे स्थापन केलेल्या महाविद्यालयामुळे वास्को सभोवताली गरीब व गरजू लोकांना शिक्षणाची मदत झाली; आमदार साल्ढाणा

आमदार एलिना साल्ढाणा यांचेही याप्रसंगी भाषण झाले. शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे. महाविद्यालयाने शिक्षणाद्वारे कित्येक लोकांना घडविले. आज एमईएस महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले विद्यार्थी जगात उत्कृष्ट क्षेत्रात वावरत आहे. ज्या ज्या ठिकाणी जातो तिथे एमईएसचे विद्यार्थी दिसत आहे. हे सगळे शक्य झाले ते स्व. अण्णा जोशी यांच्या दुरदृष्टीमुळे येथे स्थापन केलेल्या महाविद्यालयामुळे वास्को सभोवताली गरीब व गरजू लोकांना शिक्षणाची मदत झाली आहे. सगळ्यांसाठी प्रेरणा स्तोत्र होते असे श्रीमती साल्ढाणा यांनी सांगितले. याप्रसंगी श्रीमती ललिता जोशी यांचेही भाषण झाले.

सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. मीनाक्षी बावा यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य माधवराव कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व स्व. वसंतराव (अण्णा) जोशी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला सुरुवात केली. उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. एन एम जम्बागी, श्रीमती नेली रॉड्रिगीस, संस्थेचे इतर सदस्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते. डॉ. सिदालिया बोदाडे यांनी आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; झाड कोसळल्याने खोळंबा!

Goa Success Story: गणेश SSC पास हो गया! गोव्यातील वानरमारे समाजातील ठरला पहिलाच विद्यार्थी

Goa 11th Admission: अवाजवी शुल्क आकारल्यास तात्काळ कारवाई; CM सावंत यांचा विद्यालयांना इशारा

Yellow Alert In Goa: गोव्यात यलो अलर्ट, पुढील दोन दिवस महत्वाचे

Goa Drugs Case: इवल्याशा गोव्यात ड्रग्जचा सुळसुळाट; 3.8 कोटींचे अमली पदार्थ जप्त

SCROLL FOR NEXT