Goa Politics: तिरंग्याचा अपमान करणाऱ्याला जनता कदापी माफ करणार नाही...

आमदार एलिना साल्ढाणा व मंत्री माविन गुदिन्हो यांच्यातील मतभेद केवळ अफवा (Goa Politics)
BJP state President Tanawade's Seventh meeting in Dabolim constituency (Goa Politics)
BJP state President Tanawade's Seventh meeting in Dabolim constituency (Goa Politics)Dainik Gomantak

Goa Politics: दाबोळी मतदार संघात राज्य राष्ट्रवादी काँग्रेस (Goa NCP) प्रदेशाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यापूर्वी सर्वप्रथम पालिकेची निवडणूक लढवणे गरजेचे होते. दाबोळीत येऊन त्यांनी देशाच्या तिरंग्याचा अपमान केला (Insult of Tiranga) असल्याने जनता त्यांना कदापीही माफ करणार नाही. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election 2022) भाजप (Goa BJP) पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. तसेच कुठ्ठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा व पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्यात कोणतेही मतभेद (Disagreement between MLA Alina Saldhana and Minister Mauvin Gudinho) नसून फक्त समाज माध्यमांनी दोघांमध्ये पसरवलेली अफवा असल्याची माहिती गोवा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (Goa BJP President) सदानंद शेट तानावडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.

BJP state President Tanawade's Seventh meeting in Dabolim constituency (Goa Politics)
Goa Politics: पणजीत तूर्त बाबूशचाच जोर!

भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा दाभोळी मतदार संघात सातवी बैठक

गोवा भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी राज्यातील सर्व मतदार संघातील मंडळांतील विविध समित्यांबरोबर बैठका घेण्यात सुरुवात केली आहे. सोमवारी (दि. २३) भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचा दाभोळी मतदार संघात सातवी बैठक असून त्यांनी मंडळातील विविध समित्यांबरोबर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत दाबोळीचे आमदार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, दाबोळी भाजप गटाध्यक्ष संदीप सूद, जिल्हा पंचायत सदस्य तथा दाबोळी महिला मोर्चा अध्यक्ष अनिता थोरात, दाबोळी भाजप प्रभारी जयंत जाधव, मुरगावचे नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, लिओ रॉड्रिगीस, चिखलीचे उपसरपंच कमलाप्रसाद यादव, चिकोळणा सरपंच अरुण नाईक, तुळशीदास पटेकर, वामन चोडणकर, संतोष केरकर, कायतान झेवियर, सचिन चौगुले व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

BJP state President Tanawade's Seventh meeting in Dabolim constituency (Goa Politics)
वास्कोवासियांनी बायणा किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळवण्यासाठी पाठिंबा द्यावा

नौदलाला तिरंगा फडकविण्यापासून रोखून गोवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष डिसोजा यांनी देशाचा अपमान केला

पुढे पत्रकारांना माहिती देताना गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले की स्थानिक आमदार तथा पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी कार्यकर्त्यांना एकत्रित आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. दाबोळी येण्यापूर्वी गोवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी नको त्या ठिकाणी राजकारण करून स्वतःबरोबर आपल्या पक्षाची बदनामी करून घेतली आहे. स्वतंत्रच्या अमृत महोत्सवी नौदलाला तिरंगा फडकविण्या पासून रोखून डिसोजा याने देशाचा अपमान केला आहे. दाबोळीतील जनता देशाचा अपमान सहन करणार नसून त्यांना येणार्‍या विधानसभा निवडणुकीत त्याची योग्य जागा दाखवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा त्यांच्यावर निशाणा साधताना दाबोळीत विधानसभा निवडणूक लढवण्यापूर्वी पालिका निवडणूक लढविणे गरजेचे होते, असा टोला हाणला. कारण त्यानी आपली लायकी आता फक्त पालिका निवडणुकीपुरती ठेवलेली असल्याची टिका तानावडे यांनी जुझे फिलिप डिसोझा यांच्यावर केली.

BJP state President Tanawade's Seventh meeting in Dabolim constituency (Goa Politics)
Goa Assembly Election 2022: राज्यात वाहू लागलेत निवडणुकीचे वारे...

भूमिपुत्र बिलाविषयी जनतेच्या विरोधात जाणार नाही

राज्य सरकारने भूमिपुत्र बिल जैसे थे ठेवलेले असून यावर जनताच आपला निर्णय देणार आहे. राज्यातील जनतेला सरकारने मान्यता दिलेला निर्णय चुकीचा असेल तर आम्ही जनतेच्या विरोधात जाणार नाही. तसेच कोणताही निर्णय जनतेच्या विरोधात करणार नसल्याची माहिती भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली. भाजप राज्यात कोणत्याही पक्षाबरोबर स्पर्धा करत नसून फक्त जनतेपर्यंत विकास पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. कुठाळीच्या आमदार एलिना साल्ढाणा व पंचायत मंत्री गुदिन्हो यांच्या यांच्यात कोणताही मतभेद नसून फक्त त्यांच्यात काही गैरसमज असून यावर उगाच समाज माध्यमावर अफवा पसरलेली असल्याची माहिती तानावडे यांनी दिली.

BJP state President Tanawade's Seventh meeting in Dabolim constituency (Goa Politics)
हरवळे धबधब्यात पर्यटक विद्यार्थी बुडाला; धबधब्याने घेतलाय दुसरा बळी

मी मंत्री म्हणून दाबोळीचा नसून संपूर्ण गोव्याचा आहे; मंत्री माविन गुदिन्हो

दाबोळीचे आमदार तथा पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की गोव्यात जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप पक्षाला सामोरे जावे लागणार अशी माहिती प्रसार माध्यमातून येत होती. पण प्रत्यक्षात दक्षिण व उत्तरेत भाजपने जिल्हा पंचायत निवडणुकीत भरगोस यश संपादन केले. तसेच दाबोळी व कुठ्ठाळी, साकवाळ भागात जिल्हा पंचायत सदस्य बिनविरोध निवडून येऊन एक प्रकारे भाजपने वर्चस्व साधलेले होते. देशात भाजप सर्वात मोठा लोकशाही प्रधान पक्ष असून पंतप्रधान मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत यशस्वी वाटचाल करीत आहे. कोविड-१९ महामारीत राज्य सरकारने बऱ्यापैकी नियंत्रण ठेवलेले आहे. यासाठी गोव्यात भाजपने आरोग्य कार्यकर्ता तयार केला आहे. मी मंत्री दाबोळीचा नसून संपूर्ण गोव्याचा असून यावरून माझे कोणत्याही लोकप्रतिनिधींशी मतभेद नाही किंवा कोणावरही टिका काही करीत नाही. मात्र समाज माध्यमातून याला उगाच वाढवून दुजोरा देत असल्याची माहिती शेवटी मंत्री गुदिन्हो यांनी दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com