हरवळे धबधब्यात पर्यटक विद्यार्थी बुडाला; धबधब्याने घेतलाय दुसरा बळी

आंघोळीची मजा लुटताना दिल्ली येथील हर्ष राजेश कुमार (Harsh Rajesh Kumar) या 21 वर्षीय युवकाचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला.
Harwale Falls
Harwale FallsDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: जागतिक पर्यटन स्थळ असलेला परंतु पर्यटकांचा "कर्दनकाळ" ठरत असलेल्या हरवळे धबधब्याने सोमवारी (ता.23) आणखी एका पर्यटक युवकाचा (Tourist youth) बळी घेतला आहे. आंघोळीची मजा लुटताना दिल्ली येथील हर्ष राजेश कुमार (Harsh Rajesh Kumar) या 21 वर्षीय युवकाचा धबधब्यात बुडून मृत्यू झाला.

ही घटना सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. धबधब्यात बुडून मृत्यू पावलेला विद्यार्थी यंदाच बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच डिचोली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. दलाचे अधिकारी श्रीपाद गावस आणि लिडिंग फायर फायटर बी. ए. गावस यांच्या नेतृत्वाखाली दलाच्या जवानांनी तातडीने शोधमोहीम हाती घेतली. तासाभराच्या शोध मोहिमेनंतर सायंकाळी उशिरा साधारण 7.30 वाजण्याच्या सुमारास दुर्दैवी हर्ष याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथे पाठविला आहे.

Harwale Falls
Goa: पावसाने विश्रांती घेतल्यानंतर समुद्रकिनाऱ्यावर सूर्यास्ताचे नयनरम्य दृश्य

मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली येथील चार युवकांचा गट पावसाळी पर्यटनाची मजा लुटण्यासाठी सोमवारी सायंकाळी हरवळे धबधब्यावर आले होते. चौघेही आंघोळीसाठी खोल पाण्यात उतरले असता, हर्ष हा विद्यार्थी बुडाला. हर्ष याच्या रूपाने चालू महिन्यातील हरवळे धबधब्यावरील दुसरा बळी ठरला आहे. गेल्या 1 ऑगस्ट रोजी मूळ पंजाब येथील नवज्योत सिंग या 22 वर्षीय युवकाचा धबधब्यावर बुडून बळी गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com