Goa Assembly Election 2022: राज्यात वाहू लागलेत निवडणुकीचे वारे...

राजकीय पक्ष उमेदवारीची कोडी सोडवण्यात गुंतले (Goa Assembly Election 2022)
BJP Goa (Goa Assembly Election 2022)
BJP Goa (Goa Assembly Election 2022)Dainik Gomantak

Goa Assembly Election 2022: राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राजकीय पक्ष मजबूत उमेदवार शोधण्यात गुंतले आहेत. काही मतदारसंघात जातीची गणीते मांडून उमेदवार शोधले जात आहेत. उत्तर गोव्यातील स्थिती लक्षात घेता शिवोली, साळगाव या मतदारंसघात भंडारी समाजाचे प्राबल्य दिसून येते (Bhandari Samaj Vote Bank). तर प्रियोळ, सांगे, काणकोण, केपे या मतदारसंघांमध्ये अनुसुचीत जमाती (एसटी) समाजाचे प्राबल्य दिसून येते (ST Vote Bank). त्यामुळे राजकीय पक्ष अश्या मतदारसंघांमध्ये त्या त्या जातीचे मजबूत उमेदवार शोधत आहेत.

BJP Goa (Goa Assembly Election 2022)
Goa: संशोधक, वैज्ञानिकांनी भारताला नेले कीर्तीच्या शिखरावर

मागील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीवर उभे राहिलेले भंडारी समाजाचे अनेक उमेदवार निवडून आले नाहीत. याउलट इतर पक्षाच्या उमेदवारीवर उभे राहिलेले भंडारी समाजाचे उमेदवार निवडून आले. एसटी समाजाच्या उमेदवारंचा विचार करता भाजपच्या उमेदवारीवर पांडुरंग मडकईकर (कुंभारजुवे) निवडून आले तर गोविंद गावडे हे भाजपच्या (BJP) पाठिंब्यावर प्रियोळमधून निवडून आले. प्रसाद गावकर हे सांगेतून अपक्ष म्हणून निवडून आले. एसटी समाज हा भाजपचा पारंपारिक मतदार समजला जात असे, मात्र गेल्या काही वर्षात हे चित्र बदलल्याचे पाहायला मिळाले आहे. त्याचे कारण म्हणजे भाजपने एसटी उमेदवारांकडे केलेले समजले जाऊ शकते.

BJP Goa (Goa Assembly Election 2022)
Goa: ओशेल येथे दोन रशियन महिलांचा मृत्यु

तवडकरांना डावलल्याने दोन जागा गेल्या

२०१७ च्या निवडणुकीत काणकोणमधून तत्कालीन मंत्री असलेले रमेश तवडकर यांना भाजपने डावलेले व विजय पै खोत यांना उमेदवारी दिली. एसटी समाजात तवडकर यांना मोठे स्थान आहे. हे त्यांनी अपक्ष राहून १० हजार मते घेऊन दाखवून दिले. तवडकर यांना डावलल्यामुळे सांगेतील भाजपचा एसटी मतदार रुसला व त्यांनी अपक्ष प्रसाद गावकर यांना मते देऊन भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई यांना पराभूत केले. अशा रीतीने तवडकर यांना डावलल्यामुळे भाजपच्या दोन जागा गेल्या.

BJP Goa (Goa Assembly Election 2022)
वास्कोवासियांनी बायणा किनाऱ्याला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळवण्यासाठी पाठिंबा द्यावा

यावेळी कोण उमेदवार

२०२२ च्या निवडणुकीत भाजप किती एसटी नेत्यांना उमेदवारी देतो हे पहाणे उत्सुकतेचा विषय असेल. मंत्री गोविंद गावडे हे प्रियोळमधून भाजपच्या उमेदवारीवर लढण्यास तयार आहेत. मात्र मगो पक्षाशी युती झाली तर त्याना अपक्ष राहावे लागेल. दुसरीकडे काणकोण मधून विद्यमान आमदार उपसभापती इजीदोर फर्नांडिस यांना वगळून रमेश तवडकर यांना उमेदवारी दिली जाते का? तसे झाले तर किमान एका एसटी नेत्याला उमेदवारी दिल्याचे समाधान भाजपला मिळेल. कारण कुंभारजुवे मतदारसंघातून विद्यमान आमदारांना डावलून केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक यांचे पुत्र सिध्देश नाईक यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तसे झाले तर भाजपला काणकोण मध्ये इजिदोरना डावलून तवडकर यांना उमेदवारी द्यावीच लागेल. सांगेचे आमदार प्रसाद गावकर कॉंग्रेसची उमेदवारी घेणार असल्याने एसटीची मते सांभाळण्यासाठी भाजपला अशी बरीच कसरत करावी लागणार आहे हे मात्र निश्‍चित.

BJP Goa (Goa Assembly Election 2022)
Goa Politics: पणजीत तूर्त बाबूशचाच जोर!

सांगेत भाजप व काँग्रेसमध्ये सरळ लढत होण्याची शक्यता

केपे मतदारसंघात यावेळी प्रकाश शंकर वेळीप हे सध्यातरी बाबू कवळेकर यांच्याबरोबर असून कवळेकर यांचे पूर्वीचे स्वीय सचिव अर्जुन वेळीप हे आपण निवडणूक लढवणार असल्याचे जरी सांगत असले तरी प्रकाश वेळीप यांनी बांबूची अखेर पर्यंत साथ दिल्यास याचा अनुसूचित जमातीच्या (एसटी) मतांवर मोठा असा फरक जाणवणार नाही. सांगे मतदारसंघात यावेळी भाजपा व काँग्रेसमध्ये (BJP Vs Congress) सरळ लढत होणार असल्याचे चित्र दिसत असून अपक्ष आमदार प्रसाद गावकर हे अनुसूचित जमातीचे आहेत. सद्या माजी आमदार सुभाष फळदेसाई हे भाजपचे प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्याबरोबर सांगेतून दोन वेळा निवडून आलेले माजी आमदार वासुदेव गावकर, जिल्हा पंचायत सदस्य सुरेश केपेकर व या मतदारसंघातील सात पंचायतीतल बरेच पंच सदस्य फळदेसाई यांच्याबरोबर असल्याने या मतदारसंघात अनुसूचित जमातींच्या मतांमध्ये भाजपला साठ टक्के तर काँग्रेसला चाळीस टक्के मतदान होऊ शकते असे लोकांचे म्हणणे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com