Goa: Paying Tribute to Bhausaheb Bandodakar In Mhapusa. Dainik Gomantak
गोवा

Goa: मोप विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव द्या

Goa: म्‍हापसा येथील पुण्‍यतिथी कार्यक्रमात मान्‍यवरांची मागणी

Tushar Tople

म्हापसा : गोव्याचे भाग्यविधाते पहिले मुख्यमंत्री (First CM Of Goa) भाऊसाहेब बांदोडकर (Bhausaheb Bandodkar Death Anniversary) यांच्‍या ४८व्‍या पुण्यतिथीनिमित्त त्‍यांना आदरांजली वाहण्‍यात आली. मोप येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘दयानंद बांदोडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नामकरण करावे, अशी एकमुखी मागणी यावेळी सर्व मान्यवरांनी केली.

नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, नगरसेवक सुधीर कांदोळकर, तारक आरोलकर, कोमल डिसोझा, आशीर्वाद खोर्जुवेकर, बार्देश पत्रकार संघाचे अध्यक्ष तुषार टोपले, ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरुदास नाटेकर, म.गो. पक्षाचे नेते महेश साटेलकर, भारत तोरस्कर, श्रीपाद येंडे, प्रेमानंद दिवकर, भाई मोये, एकनाथ म्हापसेकर, अनिल केरकर, गीतेश डांगी, सचिन किटलेकर, माजी नगराध्यक्ष आशिष शिरोडकर, ॲड. वामन पंडित, प्रसाद पार्सेकर, रमेश मणेरकर, गोमंतक मराठा समाजाचे अध्यक्ष दुर्गेश वेरेकर, गिरीश नाईक माशेलकर, शरयू कोलवाळकर, ऋषभ माशेलकर, शेखर कवळेकर, गुरुदास वायंगणकर, किरण नाटेकर आदी मान्‍यवर यावेळी उपस्थित होते.

म्हापसा पालिकेच्या वतीने नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, म.गो. पक्षातर्फे केंद्रीय समिती सदस्य महेश साटेलकर, भाई मोये, भारत तोरस्कर, गोमंतक मराठी समाजातर्फे अध्यक्ष दुर्गेश वेरेकर, पत्रकार संघातर्फे अध्यक्ष तुषार टोपले आदी मान्यवरांनी भाऊसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला.

नगराध्यक्ष वायंगणकर यांनी सांगितले, की भाऊसाहेब बांदोडकर दूरदृष्टीचे नेते होते. त्‍यांनी शिक्षण व औद्योगिक क्षेत्रात मोठे कार्य केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या. शेतकऱ्यांना प्रोत्‍साहन दिले. कूळ मुंडकार कायदा आणला. अशा महान व्यक्तीचा आदर्श पुढे नेण्याची गरज आहे, असे सांगून मोप विमानतळाला भाऊसाहेबांचे नाव देण्याची मागणी त्‍यांनी केली. इतर मान्‍यवरांनीही विचार व्‍यक्‍त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT