पिसुर्ले: पर्ये मतदार (Poriem Constituency) संघात येणाऱ्या होंडा पंचायत क्षेत्रातील भुईपाल येथिल सरकारी माध्यमिक विद्यालयात (Bhuipal Govt. School) मुख्याध्यापिका (Headmistress) आणि शिक्षक वर्गाचे बिनसल्याचा परिणाम, शेवटी शिक्षण खात्याने मुख्याध्यापिकेची बदली (Replaced) करून वाद संपुष्टात आणला आहे. या संबंधीचा आदेश शिक्षण संचालक (Director of Education) भुषण सावईकर यांनी आज दि 13 ऑगस्ट रोजी काढला आहे. (Goa)
सदर विद्यालयात गेल्या चार पाच वर्षांपासून मुख्याध्यापिका म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या रोझी मिनेजिस यांच्ये व विद्यालयातील शिक्षक यांच्यात सुमारे एक वर्षापासून बिनसल्याने बऱ्याच वेळा मुख्याध्यापिका आणि शिक्षक वर्गामध्ये खटके उडत होते, त्यांचाच एक परिणाम म्हणून काही दिवसांपूर्वीच या विद्यालयातील शिक्षक महेश नाईक यांनी तीची पोलिस तक्रार केली होती, त्यामुळे त्यांच्या मध्ये सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला होता. त्याच प्रमाणे या विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी या वर्षीच्या मार्च महिन्यात सदर मुख्याध्यापिके विरोधात उत्तर गोवा शिक्षण खात्याकडे तक्रार करून तिच्या कडून मिळणाऱ्या वागणुकीचा पाढा वाचला होता. परंतु त्यावेळी शिक्षण खात्याने कोणतीच दखल घेतली नसल्याने मुख्याध्यापिका आणि शिक्षक यांच्या मध्ये असलेले संबंध बरेच ताणले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर सुद्धा परिणाम झाला होता.
याची दखल घेऊन शिक्षण खात्याने मुख्याध्यापिका रोझी मिनेजिस यांची बदली करून त्यांच्या जागी होंडा येथिल भगवान महावीर सरकारी विद्यालयातील मुख्याध्यापिका मोनाली नाईक यांच्या कडे या विद्यालयाचा अतिरिक्त ताबा देऊन जबाबदारी दिली आहे. दरम्यान सदर मुख्याध्यापिका या ठिकाणी रूजू झाल्या नंतर भुईपाल विद्यालयाचा निकाल समाधानकारक लागत होता, परंतू शिक्षक व तिच्या मध्ये असलेले संबंध बिघडल्याने तीची बदली करण्यात आली, त्याचा परिणाम आता विद्यार्थ्यांवर होणार असल्याचे मत काही पालकांनी व्यक्त केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.