Montha cyclone news Goa Dainik Gomantak
गोवा

Montha Cyclone: ‘मोंथा’बाबत मोठी अपडेट! 'गोव्यात' पाऊस थांबणार की नाही? वाचा माहिती..

Goa Rain: पावसाने राज्‍यात समाधानकारक हजेरी लावली. परंतु, मान्‍सून हंगाम संपल्‍यानंतर बंगालच्‍या उपसागरात ‘मोंथा’ चक्रीवादळ तयार झाल्‍याने त्‍याच्‍या प्रभावामुळे राज्‍यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

Sameer Panditrao

पणजी: बंगालच्‍या उपसागरात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेले ‘मोंथा’ चक्रीवादळ शमल्‍यामुळे राज्‍यातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील सहा दिवस राज्‍यात पावसाची शक्‍यता नसल्‍याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

यंदाच्‍या मान्‍सून हंगामात पावसाने राज्‍यात समाधानकारक हजेरी लावली. परंतु, मान्‍सून हंगाम संपल्‍यानंतर बंगालच्‍या उपसागरात ‘मोंथा’ चक्रीवादळ तयार झाल्‍याने त्‍याच्‍या प्रभावामुळे राज्‍यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

मान्‍सून संपल्‍यानंतर १ ऑक्‍टोबर ते २ नोव्‍हेंबर या काळात राज्‍यात १७.११ इंच पावसाची नोंद झाली. त्‍यातील सुमारे १२ इंच पाऊस ‘मोंथा’ चक्रीवादळ तयार झाल्‍यानंतरच्‍या काळात पडला. १ ऑक्‍टोबर ते २ नोव्‍हेंबर या काळात राज्‍यात सरासरी ६.६० इंच पाऊस पडतो.

पण, यंदा या काळात १७.११ इंच पावसाची नोंद झाली असून, हा पाऊस सरासरीच्‍या सुमारे १५९ टक्‍के इतका अधिक राहिल्‍याचे हवामान खात्‍याच्‍या आकडेवारीतून दिसून येते. दरम्‍यान, मान्‍सूनोत्तर काळात पडलेल्‍या मुसळधार पावसामुळे राज्‍यातील शेतकऱ्यांच्‍या भातपिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT