Goa Monsoon Dainik Gomantak
गोवा

Goa Monsoon: चिवार-हणजुणे येथे वडाचे झाड घरावर कोसळले; दोन लाखांचे नुकसान

सुदैवाने जीवीत हानी नाही

गोमंतक ऑनलाईन टीम

Goa Monsoon: उत्तर गोव्यातील चिवर हणजुणे येथे एक वडाचे मोठे झाड घरावर कोसळले. यात सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. सध्या म्हापशातील अग्निशमन दलाच्या जवानांनी हे वडाचे झाड हटविण्यास सुरवात केली आहे.

चिवर हणजुणे वागातोर येथील अमानी हॉटेलजवळ नारायण गावकर यांच्या घरावर हा वटवृक्ष कोसळला. त्यात या निवासी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत जीवीतहानी झालेली नाही. म्हापसा अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

हा वटवृक्ष या परिसरातील प्रसिद्ध लँडमार्क होता. गोव्यात कालपासून मॉन्सूनच्या पावसाला सुरवात झाली आहे. त्यातच बिपरजॉय चक्रीवादळाचा थोडा परिणामही गोव्यात जाणवत आहे. त्यामुळे वादळी वारे आणि पाऊस अशी स्थिती काही भागात होती.

त्यातून राज्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.

गावकर यांच्या घरावर कोसळलेला हा वटवृक्ष अर्धवट अवस्थेत कोसळला. नारायण गावकर म्हणाले की, वड एरवी ताकद आणि सौंदर्याचे प्रतिक मानला जातो. वड घरावर पडून बरेच नुकसान झाले आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या तत्पर प्रतिसादाबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Firing Case: नेमका ‘शूटर’ कोण समोर येणार? उगवे प्रकरणातील 'ते' पोलीस होते गोळीबार करणाऱ्या गटात; संशयितांविरोधात गुन्हा दाखल

खळबळजनक! 2014 मध्ये मृत्यू, 3 वर्षानंतर 'त्याच' व्यक्तीच्या नावे अन्न परवाना नूतनीकरण; FIR नोंदवण्याचा कोर्टाचा आदेश

Khanapur Elephant Death: संतापजनक! खानापुरात विजेचा शॉक लागून 2 हत्ती ठार, झटका मशीनला वीजवाहिनी जोडल्याने दुर्घटना

Polem Loliem: 4 वर्षांच्या बालकाला अमानुष मारहाण, आईच्या अटकेसाठी पोळेवासीय एकवटले; मानवी तस्करीचा प्रकार उघडकीस

Horoscope: अनपेक्षित घटना फायदेशीर, आर्थिक लाभाची शक्यता; संयम ठेवा!

SCROLL FOR NEXT