Vagator Youth Drowned: सेल्फीच्या नादात वागातोर किनाऱ्यावर बुडालेल्या तरूणाचा मृतदेह सापडला

मृत मूळचा उत्तर प्रदेशचा; रविवारी घडली होती घटना
Vagator Tourist Drowned
Vagator Tourist DrownedDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: उत्तर गोव्यातील वागातोर किनाऱ्यावर सेल्फी घेण्याच्या नादात उत्तर प्रदेशमधील एक पर्यटक तरूण बुडाला होता. त्याचा मृतदेह आज, सोमवारी आढळून आला. समुद्राच्या लाटांसोबत मृतदेह किनाऱ्यावर आला.

Vagator Tourist Drowned
Monsoon Helpline Number: राज्यात मॉन्सून दाखल! आपत्कालीन परिस्थितीसाठी दक्षिण गोव्यात हेल्पलाईन नंबर जारी

अर्जुन कुमार (वय 22) असे या मृताचे नाव असून तो मूळचा गोरखपूर, उत्तर प्रदेशचा रहिवासी होता. रविवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. अर्जून हा त्याचा मेहुणा बलिंदर कुमार आणि मित्रांसोबत स्मॉल वागातोर किनाऱ्यावर आला होता.

समुद्र खवळलेला असल्याने जीवरक्षकांनी वारंवार या तिघांनाही खडकावरून उतरण्यास सांगितले होते. पण या तिघांनीही जीवरक्षकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर मोठी लाट आली आणि अर्जून त्या लाटेसोबत वाहून गेला.

त्यानंतर जीवरक्षक, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा शोध घेतला पण तो आढळून आला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याता काहीही थांगपत्ता लागला नव्हता. अर्जून मे महिन्यात गोव्यात कामासाठी आला होता. तो फॅब्रिकेशनचे काम करत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Tourist Drowns In Goa
Goa FDA Food Inspection
Baga Beach Tourist Death
Baga Beach Tourist Death
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com