Bicholim News : 'कोळंब’ तळ्याचा बांध फोडला

मत्स्यखवय्यांची गर्दी : कारापुरात गोड्या मासळीसाठी धावाधाव
कोळंब तळे
कोळंब तळेgomantak digital team
Published on
Updated on

मोसमी पावसाची चाहूल लागताच कारापूर येथील नैसर्गिक ‘कोळंब’ तळ्याचा बांध आज रविवारी फोडण्यात आला. बांध फोडल्यामुळे तळ्यातील गोडे मासे पकडण्यासाठी मुलां-बाळांसह मत्स्यखवय्यांनी तळ्यावर गर्दी केली होती. दुपारपर्यंत तळ्यात गर्दी दिसून येत होती.

्करापूर येथील कोळंबवाड्यावर लोकवस्तीला टेकूनच मोठे नैसर्गिक तळे आहे. ‘लाल’ कमळांसाठी प्रसिद्ध असलेल्या या तळ्यातील पाण्यावर स्थानिक लोक शेती, बागायती फुलवतात. दरवर्षी पावसाळा जवळ आला की, पावसाळ्यातील प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साधारण जून महिन्यात या तळ्याचा बांध फोडून तळ्यातील पाणी आणि गाळ बाहेर सोडतात. पावसाळा संपल्यानंतर पुन्हा बांध घालून पाणी अडविण्यात येते.

कोळंब तळे
Goa Petrol-Diesel Price: पणजी-उत्तर गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजच्या किमती

अन‌् मासे आयतेच सापडतात तावडीत

कोळंब तळ्यात दरवर्षी गोड्या माशांची पैदास होत असते. तळ्यातील बांध फोडून पाणी आटले की गोडे मासे आयतेच पकडता येतात. यंदाही या तळ्यातील मासे पकडण्यासाठी कारापूरसह जवळपासच्या भागातील मत्स्यखवय्यांनी तळ्यात गर्दी केली होती. मुलां-बाळांसह महिलांही तळ्यात मासे पकडताना दिसून येत होत्या.

कोळंब तळे
Save Goa Front: ...अन्यथा भविष्यात 'या' कारणास्तव गोवेकरांमध्ये वाद होतील

मगरींचे दर्शन ः

गेल्या काही वर्षांपासून कोळंब तळ्यात मगरींचा संचार आहे. पाच वर्षांपूर्वी तळ्यात मासे धरताना स्थानिक युवकांनी एक मगरही पकडली होती. आजही तळ्यात दोन मगरी आढळून आल्या. तळ्यातील पाणी आटताच आणि आणि तळ्यात गर्दी होताच दोन मगरी पाण्याबाहेर आल्या. मात्र त्या लोकांच्या हाती लागल्या नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com