MLA Michael Lobo  Dainik Gomantak
गोवा

MLA Michael Lobo: सहकार क्षेत्रातील वित्तीय संस्थांवर नियंत्रणासाठी कायदा हवा

अशा संस्थेमध्ये सामान्य माणसांचे पैसे आणि आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात अनेक वेळेला त्याचा दुरुपयोग झाल्याचा दिसून आला आहे- लोबो

Ganeshprasad Gogate

Financial Institutions राज्यात बाहेरील राज्यांमध्ये नोंदणीकृत असलेल्या सहकार क्षेत्रातील वित्तीय संस्था आपले व्यवहार करतात. मात्र, त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचे नियंत्रण नाही. यासाठी सरकारने कायदा करून अशा संस्थांवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी केली आहे.

अशा संस्थेमध्ये सामान्य माणसांचे पैसे आणि आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात अनेक वेळेला त्याचा दुरुपयोग झाल्याचा दिसून आला आहे, ते लोबो म्हणाले. जितके दूध आम्हाला लागते. हे सगळे दूध बाहेरून आणले जाते.

या खात्याचे मंत्री हुशार आहेत. ते डेअरी फार्मर्सची बैठक घेऊन दूध उत्पादनासाठी प्रयत्न करतील. राज्याच्या काही भागात आजही पाणीटंचाई आहे. किनारपट्टी भागात प्यायला पाणी नाही आणि शेतीलाही पाणी नाही. पाईपलाईन टाकून पाणी आणण्याचे ठरले, त्याचे काय झाले? असा प्रश्‍नही लोबो यांनी केला.

‘सहकार क्षेत्रात निवृत्तीचे वय 60 करा’

सहकार क्षेत्रात अनुभवी, कुशल मनुष्यबळाची गरज पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वय ५८ वरून ६० करावे, अशी मागणी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी सभागृहात बुधवारी केली. ते पुढे म्हणाले, सरकारने सहकारी क्षेत्रातील निवृत्तीचे वय ६० केल्यास कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा लाभ घेता येईल.

पुनर्वसित साळ गावच्या लोकांनी धरणांसाठी गावे-जमिनी दिल्या त्यांना त्रास व्हायला नको. त्यांच्या जमिनी अद्यापही जलस्रोत खात्याच्या नावावर आहेत, म्हणून त्यांना फॉर्म १ आणि १४ मिळत नाही. त्यामुळे त्यांना विविध विभागाकडून परवानग्यांसाठी विलंब लागतो. एका परवानगीसाठी ६ महिने लागतात. याकडे सरकारने तातडीने लक्ष देऊन त्यांच्या समस्या सोडवाव्यात.

- डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार, डिचोली

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; रितेश, रॉय की तिसराच?

Smart Electricity Meter: 3 वर्षांत प्रत्‍येक घराला 'स्मार्ट वीज मीटर' बसणार! वीज खात्याची तयारी; अचूक बिल, चोरी रोखण्यास मदत

Goa Rain: ..होत्याचे नव्हते झाले! किनारे मोकळे, मासेमारी ठप्प, शॅक्समध्ये शुकशुकाट, शेतीचे नुकसान; पावसामुळे गोव्याला मोठा फटका

Panaji Crime: पोलीस स्टेशनसमोरच 2 गटांत राडा! संशयितांची न्यायालयीन कोठडीत रवानगी; 3 टॅक्सी, 1 दुचाकी जप्त

Ranji Trophy: गोव्याची फॉलोऑननंतर ‘जिगर’! अभिनव-मंथनची झुंजार भागीदारी; कर्नाटकविरुद्ध लढत अनिर्णित

SCROLL FOR NEXT