Indian Army Agniveer: देशसेवेसाठी अग्निवीरांची पहिली तुकडी गोव्यातून! मात्र तुकडीत एकाही गोमंतकीयाचा समावेश नाही

1422 जणांचा समावेश : देशभरातील तरुण, गोव्यातून एकही नाही; नावेलीत दीक्षांत सोहळा
Army Agniveer
Army AgniveerDainik Gomantak
Published on
Updated on

Indian Army Agniveer भारतीय सैन्यांना मदत मिळावी या उद्देशाने भारत सरकारने जी अग्निवीर योजना सुरू केली आहे, तिची पहिली तुकडी सैन्यात जायला सज्ज झाली आहे. यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे गेले वर्षभर या तुकडीचे मडगावजवळील नावेली येथील ३ एमटीआर केंद्रावर प्रशिक्षण चालू होते. असे असले तरी या तुकडीत एकाही गोमंतकीयाचा समावेश नाही.

या योजनेखाली 1, 422 अग्निवीरांची देशातील पहिली तुकडी सैन्यात दाखल होण्यास सज्ज झाली आहे. या अग्निवीरांचे प्रशिक्षण 31 जुलै रोजी पूर्ण झाले असून नावेलीतील ‘थ्री मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट’मध्ये आज त्यांचा दीक्षांत सोहळा उत्साहात पार पडला.

Army Agniveer
Subhash Shirodkar: म्हादई खोऱ्यात 5 नवी धरणे बांधणार, पाणी संवर्धनासाठी राज्य सरकार प्रयत्नशील

अग्निवीर योजना जाहीर झाल्यानंतर गोव्यात १ जानेवारीला देशाच्या विविध भागांतून आलेल्या १,४२२ युवकांनी ‘थ्री मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट’मध्ये प्रशिक्षण सुरू केले होते. ३१ जुलै रोजी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले.

अग्निवीर योजनेंतर्गत युवकांना भारतीय लष्करामध्ये भरती होता येते. या भरतीमध्ये अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल (एव्हिएशन, म्युनिशन एक्झामिनर), अग्निवीर क्लॉर्क/स्टोअर किपर, अग्निवीर ट्रेडसमन जनरल व अग्निवीर ट्रेडसमन टेक्निकल अशा पदांचा समावेश आहे.

Army Agniveer
Vijay Sardesai: 'अबकारी'तील गैरकारभाराप्रकरणी विरोधकांचा हल्लाबोल; कर वसूली आकडेवारीची सरकारकडून लपवाछपवी

या योजनेंतर्गत अर्ज केलेल्या देशातील विविध भागातील युवकांच्या निवड चाचणीची सुरुवात नावेली येथील थ्री मिलिटरी ट्रेनिंग रेजिमेंट परिसरात गेल्यावर्षी सुरू झालेली होती. अग्निवीरांची भारतीय सैन्यात एका वेगळ्या रँकवर नियुक्ती केली जाणार आहे.

जी विद्यमान रँकपेक्षा वेगळी असणार असून भरती झालेल्या युवकांपैकी 75 टक्के सैनिक चार वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त होतील, २५ टक्के सैनिकांना कायमस्वरूपी जागांवर नियुक्त करण्यात येणार आहे.

Army Agniveer
Mine Dumping In Goa: ‘ड्रोन लिडर’ या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे होणार खनिज डंप मापन, भूगर्भ खात्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

सहा प्रशिक्षणार्थींचा गौरव

नावेली मिलिटरी कँपमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी दीक्षांत संचलन झाले. त्यानंतर चांगली कामगिरी केलेल्या सूर्यप्रकाश के, करणसिंह, दीप नारायण सिंग, राजकुमार, अभिषेक पुंडिर व गौरव निखिल भीमराव या प्रशिक्षणार्थींना गौरवण्यात आले.

Army Agniveer
GI Tag For Goan Product: गोव्यातील मानकुराद, बिबिंका, वांगी, भेंडीला ‘जीआय’ मानांकन

अग्निपथ योजना

  • अग्निवीरांचा नामांकन प्रशिक्षण अवधी चार वर्षांचा आहे.

  • अग्निवीर संबंधित श्रेणी/पेशासाठी आवश्यक निवड पातत्रेच्या अटींची पूर्तता करतील.

  • शंभर टक्के अग्निवीरांना नियमीत संवर्गात नामांकनासाठीचा पर्याय दिला गेला आहे.

  • प्रत्येक बॅचच्या २५% अग्निवीरांचे सशस्र दलांच्या नियमित संवर्गात नामांकन केले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com