Chhatrapati Shivaji Maharaj Statue Vandalised Dainik Gomantak
गोवा

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: नशेत शिवपुतळ्याची विटंबना; तिघांना अटक

6 दिवसांची कोठडी: एकाची तब्येत बिघडली

गोमन्तक डिजिटल टीम

Chhatrapati Shivaji Maharaj Statue: करासवाडा, म्हापसा येथील आयडीसीच्या गेटसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनधिष्ठीत पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणात, म्हापसा पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली.

यात नायजेल फॉन्सेका (४१, आकय), आलेक्स फर्नांडिस (५१, आकय) व लॉरेन्स मेंडिस (४०, थिवी) यांचा समावेश असून, न्यायालयाने या तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यातील, लॉरेन्सची तब्येत बिघडल्याने त्यास पोलिसांनी उपचारासाठी म्हापशातील जिल्हा इस्पितळात दाखल केले आहे.

कथित दारुच्या नशेत संशयिताने चिऱ्याच्या सहाय्याने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. म्हापसा पोलिसांनी याप्रकरणी भादंसंच्या कलम २९५(अ), १५३(अ), ४२७ व ३४ अन्वये संशयितांवर गुन्हा नोंद आहे.

या घटनेनंतर, म्हापसा शहरात शिवप्रेमींची संतापाची लाट पसरली होती. त्यानंतर, शिवप्रेमींनी विटंबना केलेल्या स्थळी गर्दी करुन संशयितांची त्वरित अटकेची मागणी केली होती.

तसेच शिवप्रेमींनी सायंकाळी ६च्या सुमारास याच स्थळी मडगावहून आणलेली नवीन सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याची प्रतिष्ठापना केली. विटंबनेचा हा प्रकार सोमवारी उत्तररात्री घडला.

कालांतराने, म्हापसा पोलिसांनी संशयित नायजेल फॉन्सेका यास अटक केली. तर, नंतर पोलिसांनी त्याचे अन्य साथीदार आलेक्स फर्नांडिस व लॉरेन्स मेंडिस यांनाही ताब्यात घेतले.

याचा सुगावा जमावास लागताच, शिवपुतळ्याजवळ संशयितांची तीन दुकानांत संबंधितांनी सोमवारी रात्री अंधारात मोडतोड केली. त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उद्‍भवल्याने, करासवाडा शिवपुतळ्यानजीक पुन्हा वातावरण तंग बनले.

आश्‍वासनानंतर जमाव माघारी

मात्र, पोलिसांनी या स्थितीवर नियंत्रण मिळवून जमावास पांगवले. यावेळी मामलेदार प्रवीण गावस घटनास्थळी पोहचले. परंतु काही शिवप्रेमी रात्री उशिरा १०च्या सुमारास पुन्हा म्हापसा पोलिस स्थानकाबाहेर जमले व त्यांनी संशयितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

त्यामुळे पोलिस स्थानकाबाहेर काहीकाळ वातावरण तंग राहिले. यावेळी पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी जमावास सर्व संशयितांवर कायद्याअंतर्गत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर, जमाव माघारी फिरला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: आशिया कपसाठी पाकिस्तानने जाहीर केला संघ, बाबर-रिझवानला डच्चू; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

Kshatriya Origins: बटाडोम्बा-लेना, फा-हियन गुहेतील 30000 ईसापूर्वीचे होमिनिन सांगाड्याचे अवशेष, वेदरांचा उल्लेख

Video Viral: मडगावच्या दहीहंडीत आला 'पुष्पा'! "झुकेगा नही" म्हणत त्याने काय केलं, बघा...

Opinion: 3500 ईसापूर्व काळात सुमेरियन लोकांनी ‘क्यूनिफॉर्म’ लिपी विकसित केली, छापखान्याच्या शोधामुळे वाचनकलेत क्रांती झाली

Goa Live News: मोर्ले सत्तरी येथील वासू मोरजकर यांचे मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT