Leopard In Mulgao: वन विभागाच्या मोहिमेला यश; दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

वन खात्याकडून बोंडला प्राणी संग्रहालयात रवानगी
Leopard
LeopardDainik Gomantak
Published on
Updated on

Leopard In Mulgao गेले काही दिवस मुळगाव या गावात दहशत माजवलेला बिबट्या अखेर सापळ्यात (पिंजरा) अडकला. वन खात्याने मुळगाव येथे लावलेल्या सापळ्यात मंगळवारी (ता.१५) पहाटे ३.४५ च्या सुमारास तो अडकला.

बिबट्या सापळ्यात अडकल्याची माहिती मिळताच वन खात्याच्या पथकाने मुळगाव येथे धाव घेऊन पहाटेच तिथून बिबट्याला नेले. या बिबट्याची बोंडला प्राणी संग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. मुळगावात दहशत माजवलेला बिबटा मादी होता, अशी माहिती मिळाली आहे. गेल्या पाच दिवसांत दोनवेळा हा बिबट्या सापळ्यापर्यंत आला होता. मात्र, तो फसला नव्हता.

Leopard
Mumbai Goa Highway: आत्तापर्यंत 6692 अपघात अन् 1512 मृत्यू; 15 वर्षांपासून सुरूच आहे मुंबई-गोवा महामार्गाचे काम

गेल्या काही दिवसांपासून मुळगावात भर लोकवस्तीजवळ या बिबट्याचा संचार होता. दहा दिवसांपूर्वी (ता.५) गावकरवाडा येथील गौरेश परब यांच्या पाळीव कुत्र्यला जबड्यात पकडून बिबट्या पळतानाचे दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. बिबट्याच्या लोकवस्तीजवळील संचारामुळे लोकांमध्ये घबराट पसरली होती.

या बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने आठ दिवसांपूर्वी (ता.८) गौरेश परब यांच्या घराच्या मागच्या बाजूने सापळा (पिंजरा) लावलेला होता. बिबट्याला आकर्षित करण्यासाठी या सापळ्यात कुत्र्याला ठेवण्यात येत होते.

Leopard
Mayem Biodiversity Map: मयेचा समग्र इतिहास दर्शवणारा माहितीपट अखेर सर्वांसमोर..

अखेर दहशतीतून मुळगाववासीय बाहेर

वन खातेही पिंजऱ्याजवळ बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. मात्र, पाच दिवस बिबट्या काही सापळ्यात अडकला नव्हता. मध्यंतरी दोन रात्री बिबट्या सापळ्यापर्यंत येऊन गेला होता, तसे दृष्यही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते.

काल मंगळवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात पुन्हा बिबट्या सापळ्यापाशी आला आणि सापळ्यात अडकला. बिबट्या जेरबंद झाल्याने मुळगावमधील जनतेत पसरलेली भीती आता दूर झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com