Mayem Biodiversity Map: मयेचा समग्र इतिहास दर्शवणारा माहितीपट अखेर सर्वांसमोर..

मयेचा इतिहास दर्शवणाऱ्या संकेतस्थळ, लोगोचे अनावरण
Mayem Program
Mayem Program Dainik Gomantak
Published on
Updated on

Mayem Biodiversity Map राज्यातील 191 ही पंचायतींच्या महसूल गावांचा ‘बायोडायव्हर्सिटी मॅप’अर्थात जैवविविधता नकाशा आणि नोंदणी करणे, हे सरकारचे ध्येय आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

या ध्येयाची पूर्तता झाल्यास पूर्ण राज्याचा जैवविविधता नकाशा तयार करणारे गोवा हे देशातील पहिले राज्य ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. मये गावातील समग्र इतिहास दर्शविणाऱ्या ‘जैवविविधता नकाशाचे अनावरण आणि संकेतस्थळा’चे उद्‍घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

गावची जैवविविधता जपणे काळाची गरज आहे. सरकारही त्याबाबतीत संवेदनशील आहे,असेही मुख्यमंत्री म्हणाले.

गावकरवाडा-मये येथील श्री महामाया देवस्थान सभागृहात बुधवारी (ता.१६) आयोजित या सोहळ्याप्रसंगी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट खास निमंत्रित म्हणून उपस्थित होते.

राज्य जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव प्रदीप सरमोकादम,डिचोलीचे बीडीओ श्रीकांत पेडणेकर, मये पाणलोट संघाचे अध्यक्ष सखाराम पेडणेकर, देवस्थानचे अध्यक्ष रमेश परब, सरपंच सुवर्णा चोडणकर, उपसरपंच सुफला चोपडेकर यांच्यासह अन्य पंच तसेच गोशाळेचे अध्यक्ष कमलाकांत तारी उपस्थित होते.

प्रदीप सरमोकादम यांनी जैवविविधता मंडळातर्फे मये आणि पिळगाव येथे सुरू करण्यात येणाऱ्या प्रकल्पाविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते जैवविविधता नकाशा, संकेतस्थळ आणि लोगोचे अनावरण करण्यात आले. जैवविविधता नकाशासाठी काम केलेल्या हर्षदा गावस, प्रणय वैद्य आदींचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

सखाराम पेडणेकर यांनी प्रास्ताविक केले. सुवर्णा चोडणकर यांनी स्वागत केले. हर्षदा गावस यांनी सूत्रसंचालन केले. विश्वास चोडणकर यांनी आभार मानले.

Mayem Program
Vijai Sardesai: शेतकऱ्यांशी चर्चा करून नव्हे, ‘एसी'त बसून कृषी धोरण ठरवले

नकाशातून इतिहास मांडणारे मये पहिले गाव : पर्यटन स्थळामुळे प्रकाशझोतात आलेल्या मये गावाला मोठा सांस्कृतिक इतिहास आहे. या इतिहासाची माहिती दर्शविणारा नकाशा तयार करणारे मये हे देशातील पहिले गाव ठरले आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रेमेंद्र शेट यांनी काढले. गावची समृद्ध परंपरा आणि इतिहासाचे संवर्धन करण्यासाठी आजच्या पिढीने पुढाकार घ्यावा,असे आवाहनही त्यांनी केले.

Mayem Program
Mumbai Goa Highway: आत्तापर्यंत 6692 अपघात अन् 1512 मृत्यू; 15 वर्षांपासून सुरूच आहे मुंबई-गोवा महामार्गाचे काम

तीन वर्षांच्या संशोधनानंतर साकारला नकाशा

तेराव्या शतका पासूनचा मये गावचा सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आदी वारसा याबद्दल माहिती संकलित करून ती या नकाशात समाविष्ट करण्यात आली आहे. या नकाशात जैवविविधता संपत्तीचाही अंतर्भाव करण्यात आला आहे.

हा प्रकल्प तयार करण्यासाठी तीन वर्षे संशोधनाचे काम सुरु होते. मये-वायांगिणी पंचायतीच्या सहकार्याने मये जैवविविधता व्यवस्थापन आणि पाणलोट संघातर्फे हा नकाशा तयार करण्यात आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com