Goa Employment Dainik Gomantak
गोवा

Goa Employment: 'स्थानिकांना केवळ रोजगाराची स्वप्ने दाखविली जातात'! आमदार चंद्रकांत शेट्येंचा गुदिन्‍होंवर निशाणा; औद्योगिक वसाहतींमधील प्रश्न ऐरणीवर

Goa Local Jobs In Industrial Estates: लाटंबार्सेसह इतर ठिकाणच्‍या औद्योगिक वसाहतींमधील आस्‍थापनांत स्‍थानिकांना रोजगार मिळत नाहीत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: लाटंबार्सेसह इतर ठिकाणच्‍या औद्योगिक वसाहतींमधील आस्‍थापनांत स्‍थानिकांना रोजगार मिळत नाहीत. उद्योग खात्‍याचे त्‍यावर कोणतेही नियंत्रण नाही. उद्योगमंत्री माविन गुदिन्‍हो केवळ स्‍थानिक तरुणाईला रोजगाराची स्‍वप्‍ने दाखवत आहेत, असा हल्लाबोल डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी बुधवारी सभागृहात बोलताना केला.

आमदार शेट्ये यांनी शून्‍य प्रहाराला हा विषय उपस्‍थित केला. लाटंबार्सेतील औद्योगिक वसाहतीत सरकारने अनेक कंपन्‍या, आस्‍थापनांना जमीन दि लेली आहे. परंतु या कंपन्‍या, आस्‍थापने स्‍थानिक युवक-युवतींना नोकऱ्या देत नाहीत. इतर ठिकाणच्‍या औद्योगिक वसाहतींतही असेच प्रकार सुरू आहेत. त्‍यामुळे राज्‍यातील तरुणाईमध्‍ये नाराजी पसरली आहे. तरीही उद्योग खात्‍याचे याकडे लक्ष नाही. मंत्री गुदिन्‍हो युवकांना अशा कंपन्‍या, आस्‍थापनांत नोकऱ्या देण्‍याची केवळ स्‍वप्‍ने दाखवत आहेत.

यावर सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणीही त्‍यांनी केली. त्‍यावर बोलताना मंत्री गुदिन्‍हो यांनी, सर्वोच्च न्‍यायालयाच्‍या निर्देशांनुसार अशा कंपन्‍या, आस्‍थापनांमध्‍ये केवळ गोमंतकीयांना रोजगार देता येत नाही. त्‍यामुळे ज्‍या कंपन्‍या किंवा आस्‍थापने ५० टक्‍के गोमंतकीयांची भरती करतील, त्‍यांना सरकारने सबसिडी जाहीर केली आहे, इतकेच उत्तर दिले.

कंपन्‍यांशी चर्चा करणार, स्‍थानिकांना रोजगार देणार : मुख्‍यमंत्री

पर्ये, वाळपईसह इतर औद्योगिक वसाहतींतील ‘एसीजीएल’सारख्‍या खासगी कंपन्‍या स्‍थानिकांना रोजगार देत नसल्‍याचा मुद्दा पर्येच्‍या आमदार डॉ. दिव्‍या राणे यांनीही मांडला. त्‍यावर, अशा कंपन्‍यांशी आपण चर्चा करणार असून स्‍थानिकांना अधिकाधिक रोजगार देण्‍याच्‍या सूचना त्‍यांना करणार आहे, असे आश्‍‍वासन मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT