Widows in Goa Dainik GOmantak
गोवा

Panaji News : विधवा प्रथेविरोधात कायदा करणे काळाची गरज

विधानसभेत सर्व आमदारांनी खासगी सदस्य ठरावाला पाठिंबा देण्‍याचे समाजसेवकांचे आवाहन

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी : विधवा प्रथा बंद करण्यासाठी ३१ मार्च रोजी विधानसभेत चर्चेसाठी येणाऱ्या खासगी सदस्य ठरावाला सर्व आमदारांनी पाठिंबा देण्याचे आवाहन अनेक संस्‍था तसेच मान्‍यवर व्‍यक्तींनी केले आहे. जर आमदारांनी हा ठराव एकमताने मंजूर केला आणि महिलांचा मूलभूत मानवीहक्क पायदळी तुडवणारी ही प्रथा बंद केली तर गोवा विधानसभेचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जाईल, असे समाजकार्यकर्ते नमन सावंत, संगीता नाईक, प्रकाश कामत व गेलाल्‍डिन मिनेझिस यांनी प्रसिद्धीस दिलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे.

सर्वच धर्म, जात, पंथांमध्ये विधवा महिलांची दशा बहुतांशी सारखीच आहे. पतीचा मृत्यू झाल्यानंतर तिला भेदभाव, अपमान, छळ आणि मानसिक अवहेलनेला सामोरे जावे लागते. हा भेदभाव थांबवल्याने समाजाचे कोणतेही नुकसान किंवा हानी होणार नाही. उलट विधवा म्हणून टॅग झालेल्या महिलेला नवीन जीवन मिळेल.

२०११च्या जनगणनेनुसार गोव्यात ७७ ह जास्त विधवा महिला होत्या. गेल्या १२ वर्षांत लोकसंख्या वाढल्याने हा आकडा एक-दोन लाखांच्या पुढे गेला असावा. जर समाजाने त्यांच्याबद्दल थोडा संवेदनापूर्वक विचार करण्याचे ठरवले तर या सर्व महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणता येईल, असे नमूद करण्‍यात आले आहे.

विधवांनी पूर्वनिर्धारित पद्धतीने कपडे परिधान करणे समाजाला अपेक्षित असते. जेव्हा त्या घराबाहेर पडतात तेव्हा त्यांची वैवाहिक स्थिती स्पष्ट होते. दुर्दैवाने हा प्रकार विधुर पुरूषांच्या बाबतीत होताना दिसत नाही. विधवेला धार्मिक आणि कौटुंबिक समारंभात तिची उपस्थिती अशुभ मानली जाते आणि बाजूला केले जाते, असे उभयतांनी पत्रकात म्‍हटले आहे.

विधवा महिला वयाने कितीही लहान असली तरी तिच्या नावाला अशुभ टॅग जोडल्यामुळे पुनर्विवाहाची दारे तिच्यासाठी उघडी असतातच असे नाही. तिची कोणतीही चूक नसताना आपल्या बरोबरच्या माणसाचा होणारा हा अवाजवी छळ थांबवण्याची वेळ आता आली आहे.

समाजाने भेदभाव थांबवला पाहिजे आणि सुहासिनी महिलांना जो सन्मान दिला जातो, तोच सन्मान आणि दर्जा विधवा महिलांनाही मिळाला पाहिजे. पतीच्‍या अंत्यसंस्कारावेळी तिची होणारी विटंबना तर खूपच क्‍लेशदायक असते. अशा अमानवीय प्रथा बंद करण्यास सर्व आमदारांनी सहकार्य करावे, असे आवाहन या पत्रकात करण्‍यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Padma Shri Prasad Sawkar: आठवणीत वसलेले प्रसाद सावकार

आगामी निवडणुकांमध्ये तरुणांसह महिलांना देणार संधी! 'जेनझी'शी राजकीय 'कनेक्ट' गरजेचा- विजय सरदेसाई

Goa Politics: भाजप सरकारचा अहंकार जनता मोडेल! अरविंद केजरीवालांची टीका, कारापूर आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा केला निषेध

Section 39A Protest: आता गावागावांतून आंदोलन! कलम '39अ'विरोधात आमदार वीरेश बोरकर यांची घोषणा

खरी कुजबुज: सरकारची अशीही हुशारी!

SCROLL FOR NEXT