Goa Tourism : पर्यटन क्षेत्रावर पुन्हा चिंतेचे सावट

सरकार सतर्क : ‘एच3एन2’सह कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे व्यावसायिक धास्तावले
Goa Tourism
Goa TourismDainik Gomantak

वाढते कोरोनाबाधित आणि नव्याने आढळलेल्या ‘एच३एन२’च्या रुग्णांमुळे राज्यातील पर्यटन क्षेत्रांशी निगडीत व्यावसायिकांवर चिंतेचे सावट पसरले आहे. कोरोनामुळे 2020व 2021असे दोन पर्यटन हंगाम वाया गेले होते.

गत वर्ष काहीसे बरे गेलेले असताना आता या नव्या विषाणू संसर्गाची व्यावसायिकांत धास्ती दिसत आहे. अर्थात केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांनुसार आम्ही निर्णय घेऊ, अशी त्यांची भूमिका आहे.

ट्रॅव्हल टुरिझम असोसिएशन गोवाचे अध्यक्ष नीलेश शहा म्हणाले, कोरोनामुळे पर्यटन व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला आहे. आता तो हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यापूर्वीच्या महामारीचा अनुभव व्यावसायिकांना असल्याने ते सतर्कतेच्या उपाययोजना करतील.

Goa Tourism
Canacona: आता 'या' दोन एक्सप्रेस रेल्वेगाड्याही काणकोणमध्ये थांबणार

कोरोनाचे नवे 23 रुग्ण, एकूण बाधित 137

बुधवारी कोरोनाचे नवे 23 रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण रुग्णसंख्या 137 इतकी झाली आहे. आरोग्य खात्याचे साथ रोग विभाग प्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी सांगितले, की ‘एच3एन2’चे नमुने पॉझिटिव्ह आल्याने राज्यात या विषाणूचा प्रादुर्भाव पसरला आहे. तो आणखी वाढण्याची शक्यता आहे. यासाठी नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी.

..तर व्यवसायावर परिणाम!

यंदाचा आंतरराष्ट्रीय पर्यटक हंगाम संपत असला तरी एप्रिल आणि मेच्या दरम्यानचा देशी पर्यटकांचा मोठा व्यवसाय असतो. बाधितांची संख्या अशीच वाढत गेल्यास केंद्र आणि राज्य सरकारकडून अधिकचे निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्याचा व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, असे नीलेश शहा म्हणाले.

Goa Tourism
CRZ Goa: गोवा सरकारने CRZ बाबत हरित लवादाकडे मागितला 2 आठवड्यांचा वेळ

वेट अँड वॉच!

राज्यात वाढणारी बाधितांची संख्या पर्यटन क्षेत्रासाठी धोकादायक नसली तरी यामुळे आम्ही सतर्क झालो आहोत. व्यावसायिकांनीही काळजी घ्यावी, नियमांचे पालन करून पर्यटन व्यवसाय करावा. सध्या तरी आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत.

- सावियो मसायस, माजी अध्यक्ष, टीटीएजी

पंतप्रधानांनी घेतला संसर्गाचा आढावा

देशभरातील कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठक घेत परिस्थितीचा आढावा घेतला. छत्तीसगड, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि केरळमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्रीय यंत्रणा सावध झाल्या आहेत.

नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करत जिनोम सिक्वेन्सिंगचे प्रमाण वाढविण्यात यावेत, असे निर्देश मोदींनी दिले. रुग्णालयांनी तयारी वाढविण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करावे, तसेच सर्वांनी स्वच्छतेचे भान ठेवतानाच संसर्ग टाळण्यासाठी योग्य उपाय करावेत, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com