Goa Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Goa Kala Academy: डिसेंबरपर्यंत कला अकादमीला नवा 'साज'

Goa Kala Academy: नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून बहुतांश काम अंतिम टप्प्यात झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Kala Academy: कला अकादमीच्या नूतनीकरण कामाच्‍या निविदा प्रक्रियेवरून कला-संस्कृती आणि सार्वजनिक बांधकाम खाते एकमेकांकडे बोट दाखवत आहे. प्रत्यक्षात हे नूतनीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून शेकडो कामगार रात्रंदिवस काम करीत आहेत.

बहुतांश ठिकाणचे काम अंतिम टप्प्यात आले असले तरी संपूर्ण काम संपण्यास डिसेंबर महिना उजाडेल, असे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांचे मत आहे. संगीत, नृत्य, नाटक, फाईन आर्ट, लोककला, साहित्य आदी विषयावर प्रशिक्षण, संशोधन आणि कार्यक्रमांसाठी 1970 पासून अकादमी कार्यरत आहे.

प्रसिद्ध आर्किटेक्चर चार्ल्स कुरैय्या यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या इमारतीला अलीकडच्या काळात मोठी गळती लागली होती. मुख्य सभागृह, कृष्णकक्ष, आणि प्रदर्शन हॉलमध्ये पावसाळ्यात कार्यक्रम घेणे अशक्य झाले होते. गळती काढण्यासाठी अनेक वेळा मुख्य इमारतीवर नव्याने स्लॅब टाकला होता.

हा ओव्हरलोड काढण्यासाठी आणि कलाकार कला अकादमीचे संपूर्ण नूतनीकरण करण्यासाठी कला आणि संस्कृती खात्याने निविदा न काढता केवळ मंत्रिमंडळाच्या मान्यतेने हे काम खासगी कंपनीला दिले आहे. यावरून सध्‍या वाद सुरू आहे.

नूतनीकरणावर 56 कोटींचा खर्च

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या मान्यतेने टेकटॉन बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला 3 मे 2021 मध्ये कला अकादमीच्या नूतनीकरणाचे काम 39.6 कोटी रुपयांना देण्यात आले, असून यावर वेगवेगळा कर लावल्यानंतर हे काम 56 कोटी रुपयांच्या वर जाणार आहे. याशिवाय या संपूर्ण कामावर निरीक्षण ठेवण्यासाठी मेसर्स रेलइंडिया टेक्निकल अँड इकॉनोमिक सर्विसेस यांना नेमण्यात आले आहे.

  • टेकटॉन बिल्डकॉन कंपनी गेल्या दीड वर्षांपासून नूतनीकरणाचे काम करीत आहे. आता या कामाला वेग आला आहे. संपूर्ण इमारतीवरचा लोड हटवण्यात आला असून गळती थांबविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘प्लास्टरिंग’ करण्यात आले आहे. आता कुलिंग, फायर आणि इलेक्ट्रिसिटीची कामे सुरू आहेत.

  • दुसऱ्या बाजूला मुख्य सभागृहाच्या सिलिंगचे काम सुरू झाले असून एकाच वेळी अनेक विभागाची कामे सुरू आहेत. यावर शेकडो कामगार दिवसरात्र काम करीत आहेत. फरशी आणि फ्लोरिंगचे काम या आठवड्यात संपेल, अशी माहिती साईड अभियंत्याने दिली आहे.

गोविंद गावडे , मंत्री, कला आणि संस्कृती-

कला अकादमीचे काम हे रस्त्याचे काम नाही की जे तातडीने करता येईल. कामाच्या गुणवत्तेसाठी वेळ, गुणवत्तापूर्ण तंत्रज्ञान, कुशल मनुष्यबळ आणि दर्जेदार साधनसामग्रीची गरज असते, ते सध्या पुरविले जात आहे. या कामावर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते देखरेख करीत आहेत. कंपनीचे अनेक तज्ज्ञ अभियंते कामगार कार्यरत आहेत. हे काम नोव्हेंबरपर्यंत संपेल, अशी आशा आहे.

हृदयनाथ नेसरीकर, अभियंता, साबांखा-

कला अकादमीचे काम ठरवून दिलेल्या गुणवत्तेनुसार होत आहे. त्याला वेळ लागेल. ज्या कामांना जितका वेळ आवश्यक आहे तितका वेळ द्यावाच लागेल. त्यामध्ये कोणत्याच प्रकारची घाई करता येणार नाही. त्यामुळे हे काम पूर्ण होण्यासाठी डिसेंबर उजाडेल, अशी शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

SCROLL FOR NEXT