Goa News: स्थलांतर झाले, मात्र दुकानात बसतोय कोण?

Goa News: गोमेकॉच्या प्रवेशद्वारासमोर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे अखेर स्थलांतर झाले.
Goa News
Goa News Dainik Gomantak

Goa News: गोमेकॉच्या प्रवेशद्वारासमोर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे अखेर स्थलांतर झाले. परंतु स्थलांतर होऊनही या विक्रेत्यांना दुकानगाळ्यांमध्ये बसण्यात रस नसल्याचे दिसून येते. मिळालेल्या दुकानगाळ्यांना कुलूप लावून पार्किंग क्षेत्रात दुकाने थाटून व्यवसाय करीत असल्याचे दिसून येत आहे.

मुख्यमंत्र्यांनी दुकान गाळे वाटपप्रसंगी पुन्हा रस्त्याच्या बाजूला विक्री करू नका, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा दिला होता, परंतु या इशाऱ्याला या विक्रेत्यांनी कोलदांडा दाखविला आहे. गेल्या वर्षी गोमेकॉच्या प्रवेशद्वारासमोरील फळविक्रेते व इतर खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे गाडे पोलिस बंदोबस्तात हटविण्यात आले होते.

गोमेकॉमध्ये येणाऱ्या रुग्णवाहिकांना या दुकानदारांच्या समोर उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे गोमेकॉ व्यवस्थापनाने सांताक्रूझ पंचायतीला पत्रव्यवहार करून हे गाडे हटविण्याची मागणी केली होती.

Goa News
Goa Municipality: कर्मचाऱ्यांनो सहकार्य करा- दामोदर शिरोडकर

त्यानंतर त्याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे हा विषय गेल्यामुळे त्यांनी तत्काळ कारवाई करीत पोलिस बंदोबस्तात ही दुकाने हटविली होती. दुकानगाळे हटविल्यानंतर गोमेकॉच्या संरक्षण भितींजवळील काही जागा सार्वजनिक बांधकाम खात्याने ताब्यात घेत त्याठिकाणी दुकानगाळे उभारले. परंतु गाळ्यांचे वाटप न झाल्याने विक्रेत्यांनी काही दिवस आंदोलनही केले होते.

वस्तूंची विक्री करणारी वाहने

अतिक्रमित दुकाने हटविल्यानंतर याठिकाणचा परिसर स्वच्छ करून दोन मार्ग तयार करण्यात आले. त्याशिवाय येथे शौचालयाची व्यवस्था करण्यात आली. मोकळ्या जागेत पार्किंगची सोय झाली, परंतु त्याठिकाणीही आता वाहनातून वस्तू विक्री करणारी वाहने उभी करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

Goa News
Amit Patkar: बेकायदेशीर जमीन रुपांतरातून दिसतयं 'मायकल लोबोंचे' काम

पण ऐकतो कोण?

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी बेरोजगारांसाठी दीनदयाळ स्वयंरोजगार योजनेंतर्गत चार गाडे घालण्यास परवानगी दिली होती. ते गाडेही अतिक्रमण हटवामध्ये उठविण्यात आले होते. आता नव्या जागेत त्यांचे स्थलांतर झाले, मात्र या गाडेधारकांनी गाड्याच्या भोवताली शेडची उभारणी करीत टेबल-खुर्च्या टाकून व्यवसाय सुरू केला आहे. विक्रेत्यांना गाड्याव्यतिरिक्त केलेले अतिक्रमण काढण्याच्या सूचनाही केल्या, पण ऐकतो कोण असा प्रश्‍न एका पंचसदस्याने उपस्थित केला.

‘सीएम’च्या आवाहनाला कोलदांडा

या अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांविषयी सांताक्रूझ पंचायतीने आता उपजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. कारण दुकानगाळ्यांचे वाटप झाल्यानंतर दुकानातच बसून व्यवसाय करावा, असे सांगूनही आता फळविक्रेते दुकानाबाहेर व्यवसाय थाटत आहेत. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आवाहनाला या विक्रेत्यांनी कोलदांडा दाखविला आहे, त्यामुळे आता प्रशासन काय दखल घेते, हे पहावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com