Goa News: '25' दिवस उलटूनही चंद्रशेखरच्या मृत्यूचे गूढ कायम!

Goa News: या प्रकरणाला सुमारे पंचवीस दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही.
Goa News
Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: चंद्रशेखर वेळीप या युवकाच्या संशयास्पद मृत्यूचा अद्याप उलगडा होत नसल्याने नातेवाईकांनी आज श्री मल्लिकार्जुन देवाला गाऱ्हाणे घातले. आज पर्यंत या प्रकरणाला सुमारे पंचवीस दिवस उलटूनही पोलिसांच्या हाती काहीच लागलेले नाही.

काणकोण तालुक्यातील कर्णमळें -भाटपाल या ठिकाणी असलेल्या कपेलजवळ तळपण नदी पात्रात चंद्रशेखरचा मृतदेह 20 सप्टेंबरला सापडला होता. पण त्याच्या गावांतील लोकांनी त्याचा खूनच असल्याचा दावा करून त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी करावी, असे निवेदन त्याचे काका अशोक गावकर व गावातील सुमारे सत्तर नागरिकांनी काणकोण पोलिसांना दिले होते.

Goa News
Goa Municipality: अखेर वाळपई पालिका जागी!

त्याच्या प्रती काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांच्याकडेही याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. प्राथमिक तपासात पोलिसांना त्यांच्या बँक खात्यातील व्यवहाराबाबत माहिती हाती लागलेली आहे. पण मृत २५वर्षाचा असल्याने त्याचा लैंगिक संबंध कुणाशी होता का, हेही शोधणे गरजेचे आहे,असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

गावात तणावपूर्ण स्थिती

गेल्या पंचवीस दिवसांमध्ये चौकशीत काहीच तशी प्रगती झालेली दिसत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आपले कुलदैवत आणि काणकोणचे आराध्य दैवत श्री मल्लिकार्जुन देवाला श्रीफळ ठेवून गाऱ्हाणे घातले आहे.

Goa News
Goa ZP Election 2022: भाजप सुसाट, काँग्रेस भुईसपाट!

सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी न झाल्याने या गावात वातावरणही तणावपूर्ण बनले असून येत्या काळात श्रीस्थळ भागातील वाड्या वाड्यावर बैठका घेऊन हा विषय गंभीर रित्या पुढे नेण्याची ग्रामस्थांनी तयारी चालविली आहे.

मृताच्या चेहऱ्यावर जखमा, खांद्यावर रक्त !

चंद्रशेखर वेळीप हा मूळ वेळीपवाडा नुवें श्रीस्थळ काणकोण येथील होता. पण तो गांवडोंगरीत नातेवाइकांकडे राहत होता. रविवार 18 सप्टेंबर पासून तो घरी आला नव्हता. जेव्हा त्याचा मृतदेह मिळाला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर जखमा होत्या. त्याच्या खांद्यावर रक्ताचे डाग होते. त्याचा दावा हात मोडलेल्या अवस्थेत होता. अंगावरचे टीशर्ट गायब कसे झाले हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे हे प्रकरण खूनाचेच आहे, हे सिद्ध होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com