Jeet Arolkar Dainik Gomantak
गोवा

Goa: सीईटी परीक्षेसाठी जीत आरोलकरांकडून विद्यार्थ्यांना 'ऑफर'

सेवा मोफत मांद्रे (Mandre) मगोच्या कार्यालयात उपलब्ध आहे ,18 जुलै पर्यंत हि नाव नोंदणी सुट्टीच्या दिवशी सुधा चालू असणार आहे , अशी माहिती जीत आरोलकर (Jeet Arolkar) यांनी दिली आहे.

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदार संघाचे (Mandre Constituency) मगोचे युवा नेते जीत आरोलकर (Jeet Arolkar) यांच्याकडून मांद्रे मतदार संघातील जनतेला यापूर्वीच डिजिटल सेवा कार्यानिवीत केली आहे , आता नुकताच शालांत परीक्षेचा निकाल लागलेला आहे , त्यात दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्याना , जे विध्यार्थी दहावी नंतर डिप्लोमा किंवा विद्यान शाखेत प्रवेश घेणार आहे , त्यासाठी विधार्थ्याना अगोदर सिईटी परीक्षा द्यावी लागणार आहे , त्यासाठी ऑनलाईन परीक्षा (Online Exam) होणार आहे ,इंटरनस परीक्षा ऑनलाईन देण्यासाठी विधार्थ्याना नाव नोंदणी करायची आहे , ती सेवा मोफत मांद्रे मगोच्या कार्यालयात उपलब्ध आहे , 18 जुलै पर्यंत हि नाव नोंदणी सुट्टीच्या दिवशी सुधा चालू असणार आहे , अशी माहिती जीत आरोलकर यांनी दिली आहे.

मांद्रे मतदार संघातील जे विध्यार्थी गरीब आहे ,आणि त्याना आर्थिक अडचण आहे , त्या गरजवंत विध्र्थ्यानी या कार्यालयात येवून या योजनेचा लाभ घ्यावा , जी काही विद्यार्थ्यांची फी असेल ती जीत आरोलकर भरणार आहे असे कळवण्यात आले.

मान्द्रेत मोफत व्हायफाय

मगोचे नेते जीत आरोलकर यांनी मान्द्रे मतदार संघातील ग्रामीण भागात अनेक विध्यार्थ्यांकडे मोबाईल नाही , इन्टरनेट सेवा नाही , इन्टरनेट नसल्याने विध्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षणाला मुकावे लागते , प्रत्येक ग्राम पातळीवर पंचायतीने जागा उपलब्ध करून दिली तर विध्यार्थ्यासाठी एकत्रित बसण्याची सोय व मोफत व्हायफाय इन्टरनेट सेवा उपलब्ध करून देण्याची घोषणा जीत आरोलकर यांनी केली.

दरम्यान मांद्रे मतदार संघातील सर्व गरजू नागरिकाना सरकारची सर्व जे ऑनलाईन कागदपत्रे विविध कामासाठी लागतात , ती या पुढे आपल्या मांद्रे कार्यालयातून मोफत उपलब्ध करून देणार असल्याचे मगोचे नेते जीत आरोलकर यांनी सरकारने डिजिटल इंडियाच्या माध्यमातून अनेक जी सरकारी कागदपत्रे , त्यात शेतकऱ्यासाठी लागणारा एक चौदाचा , उतारा . बेरोजगार युवकांसाठी रोजगार नोंदणी व विविध कामानिमित्ताने सरकारी कागद पत्रे आता ऑनलाईन सेवा सुरु केली आहे . त्यासाठी सर्वसामान्य जनतेची हि कागदपत्रे मिळवण्यासाठी बरीच धावपळ करावी लागते . ती सोय आता मगोचे नेते जीत आरोलकर यांनी मगो पक्षाच्या वतीने मांद्रे कार्यालयात उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरु केल्याची माहिती जीत आरोलकर यांनी केली आहे.

जीत आरोलकर यांनी बोलताना सरकारने महत्वाची कागदपत्रे आता ऑनलाईन पद्धतीने केल्यामुळे ती जे आमची असुशिक्षित शेतकरी आहे त्याना ती मिळवण्यासाठी खूप अडचणी येतात . या सर्व अडचणी लक्षात घेवून हि सुविधा आपल्या कार्यालयातून उपलब्ध तीही मोफत दिली जाईल असे जीत आरोलकर यांनी सांगितले.

वेळप्रसंगी घरपोच सेवा

काहि नागरिकाना जर कार्यलयात येण्याच्या अडचणी असतील किंवा त्यांनी आम्हाला आपल्याला कोणती कागदपत्रे हवीत ती कळवली त्या संबधी माहिती दिली तरीही आम्ही कागदपत्रे संबधित नागरिकांच्या घर पोच करू शकतो , ज्याना यायला शक्य नाही अश्या नागरिकांसाठी हा उपक्रम असल्याचे जीत आरोलकर यांनी सांगितले.

मगोचे नेते जीत आरोलकर यांनी पुढे बोलताना सध्या कोरोना महामारीचा काळ आहे प्रत्येकाने आपापली व आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यावी , या काळात मांद्रे उदर्गत आणि मगो तर्फे माद्रे मतदार संघात विविध योजना , उपक्रम राबवले जात आहेत . सरकार आपल्या पद्धतीने योजना राबवतो त्या योजना ज्या मतदारांनी विश्वास ठेवून लोकप्रतिनिधित्व दिले ते मात्र मतांची गणिते जोडण्यासाठी आपल्याच समर्थकाना लाभ मिळवून देतात , मात्र आम्हाला या योजना राबवताना कोणतेही राजकारण करायचे नाही . काही लोकप्रतिनिधी पेडणेकरांच्या मतावर मोठे झाले तेच प्रतिनिधी आपल्या भाषणात केवळ आपण जनतेचा नोकर आणि सेवक असेल अशी भाषणे करतो , कृतीतून कधी वागत नाही , असा दावा जीत आरोलकर यांनी केला.

मांद्रे मतदार संघात आजही पाण्याची समस्या आहे त्यावर अजूनपर्यंत उपाय योजना केली नाही , तुये येथील नियोजित पाणी प्रकल्पाला चालना देण्याची गरज आहे , मान्द्रेतील अनेक रस्ते पाण्याखाली जातात रस्त्यांच्या बाजूची गटार व्यवस्था कोलमडली आहे , त्यावर पाऊस तोंडावर येवून सुधा उपाय योजना न केल्याने जीत आरोलकर यांनी नाराजी व्यक्त केली .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute Baga: उत्तर गोव्यातील प्रसिद्ध भाग दाखवला रेड लाईट एरिया; Youtuber ने हात जोडून मागितली माफी

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Sudarsan Pattnaik: 'तर गोव्यात अनेक वाळू शिल्प कलाकार घडतील'! पद्मश्री सुदर्शननी केले गोवन संस्कृतीचे कौतुक, म्हणाले की..

Dream Meaning: मी रात्री गाढ झोपलो आणि.....नशीब!! स्वप्नं आपल्याला काही सांगू पाहतायत का?

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

SCROLL FOR NEXT