पणजी: राज्यात जुलैच्या पहिल्या पंधरा दिवसात तब्बल 2,18,955 लसीकरण झाले आहे. गोव्यातील (Goa) 18 वर्षावसरील सुमारे साडेअकरा लाख व्यक्तींना 31 जुलैपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्याचा संकल्प मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी केला आहे. आणि त्यानुशंगाने लसीकरणाचा वेगही वाढवण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत 11,37,125 लसीकरण झालेले असून त्यात 9,43,155 लोकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस तर 1,93,970 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. आज 15 रोजी 10,902 लसीकरण झाले.
एका बाजुला राज्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरु असून दुसरीकडे कोरोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. 1 जुलै ते 15 जुलै या पंधरा दिवसात राज्यात 66,034 कोरोना चाचण्या करण्यात आल्या. जाहिर अहवालानुसार या पंधरा दिवसात 2,652 नवे कोरोना बाधित सापडले तर 3099 कोरोना बाधीत बरे झाले. या पंधरा दिवसात ४८ कोरोना बाधितांचे निधन झाले.
1 जुलै ते 15 जुलै लसिकरण व कोरोना आकडेवारी
लसीकरण- 2,18,955
कोरोना चाचण्या -66,034
नवे कोरोना रुग्ण- 2,652
बरे झालेले कोरोना रुग्ण- 3,099
कोरोनामुळे मृत्यू - 48
आज ता.१५ जुलै चे लसीकरण व कोरोना आकडेवारी -
आत्तापर्तंयचे एकूण कोरोना बाधीत - 1,69,341
बरे झालेले कोरोना एकूण कोरोना बाधीत- 1,64,460
आत्तापर्यंतचे एकूण लसीकरण - 11,37,125
आजचे लसीकरण -10,902
आज पहिला डोस - 5,992
आज दुसरा डोस - 4,910
आजच्या कोरोना चाचण्या- 4,063
नवे कोरोना बाधीत- 126
बरे झालेले कोरोना बाधीत - 134
कोरोना बळी- 1
आत्तापर्यंतचे कोरोना बळी- 3,102
आजचे सक्रिय कोरोना बाधीत -1,779
कोरोना बरे होण्याची टक्केवारी - 97.12
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.