India US Oil Partnership
India US Oil PartnershipDainik Gomantak

अमेरिकेचा भारताला 'सॅल्युट'! तेल बाजारातील स्थिरतेसाठी मोदी सरकारची भूमिका ठरली निर्णायक; अमेरिकन राजदूतांकडून तोंडभरुन कौतुक

India US Oil Partnership : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारात स्थिरता राखण्यासाठी भारताने बजावलेल्या भूमिकेचे अमेरिकेने तोंडभरुन कौतुक केले.
Published on

India US Oil Partnership: पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जागतिक तेल बाजारात स्थिरता राखण्यासाठी भारताने बजावलेल्या भूमिकेचे अमेरिकेने तोंडभरुन कौतुक केले. भारतातील अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी स्पष्ट केले की, जगभरातील तेलाच्या किमती स्थिर ठेवण्यामध्ये भारत हा एक अत्यंत महत्त्वाचा भागीदार ठरला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या एका पोस्टमध्ये गोर यांनी नमूद केले की, भारत हा जगातील सर्वात मोठ्या तेल ग्राहकांपैकी आणि रिफायनर्सपैकी एक आहे. त्यामुळे रशियन तेलाची भारताकडून होणारी खरेदी ही जागतिक बाजारपेठेतील समतोल राखण्याच्या प्रयत्नांचाच एक भाग असल्याचे अमेरिकेने (America) मान्य केले. अमेरिकन आणि भारतीय नागरिकांच्या हितासाठी दोन्ही देशांनी मिळून काम करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले.

India US Oil Partnership
Iran-USA War: "युद्ध कधी संपवायचं हे अमेरिका नाही, आम्ही ठरवू'' ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणचा संतप्त इशारा; तेलपुरवठा रोखण्याचीही दिली धमकी

या संदर्भात व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लीविट यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यात जे अडथळे निर्माण झाले आहेत, त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी 'तात्पुरती परवानगी' दिली. भारताला ही सवलत देण्यामागे भारताची 'चांगली प्रतिमा' कारणीभूत असल्याचे लीविट यांनी स्पष्ट केले.

भारत (India) हा एक विश्वासार्ह मित्र असून त्यांनी यापूर्वी रशियावरील निर्बंधांचे पालन केले होते. आता इराणमुळे निर्माण झालेल्या तेल पुरवठ्यातील तात्पुरती तूट भरुन काढण्यासाठी भारताला ही सवलत देण्यात आली. विशेष म्हणजे, अमेरिकेचे कोषागार सचिव स्कॉट बेसेन्ट यांनी भारताला रशियन तेल खरेदी करण्यासाठी 30 दिवसांची विशेष सवलत जाहीर केली असून यामुळे रशियाला कोणताही मोठा आर्थिक फायदा होणार नाही याचीही काळजी घेतली जात असल्याचे अमेरिकेने म्हटले.

India US Oil Partnership
Iran US War: ''सार्वभौमत्वावर घाला घालाल तर...'' इराणी राष्ट्राध्यक्षानं ट्रम्पला दिला सज्जड दम; 'आर-पार'च्या लढाईचा व्यक्त केला निर्धार!

दरम्यान, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारा इंधन पुरवठा रोखण्यासाठी इराणकडून केल्या जाणाऱ्या संभाव्य प्रयत्नांवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला की, जर त्यांनी या जलमार्गात एक जरी सुरुंग (Mines) पेरला असेल, तर तो त्वरित हटवण्यात यावा. जर हे सुरुंग तातडीने काढले गेले नाहीत, तर इराणला अशा लष्करी परिणामांना सामोरे जावे लागेल, जे जगाने यापूर्वी कधीही पाहिले नसतील. ट्रम्प यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, अंमली पदार्थांच्या तस्करांविरुद्ध वापरले जाणारे क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आता हॉर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या इराणी जहाजांना नष्ट करण्यासाठी वापरले जाईल आणि अशा जहाजांचा नायनाट अत्यंत वेगाने आणि हिंसक पद्धतीने केला जाईल.

India US Oil Partnership
Iran-Israel war impact on India: इराण-इस्रायल तणावामुळे भारतात महागाईचा 'बॉम्ब' फुटणार? पेट्रोल-डीजलसह 'या' वस्तूंच्या किमती भडकणार

पश्चिम आशियातील ही परिस्थिती आता केवळ इराणपुरती मर्यादित राहिलेली नाही. इराणने शेजारील आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळ, दूतावास आणि ऊर्जा पायाभूत सुविधांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लक्ष्य करण्यास सुरुवात केली. संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, बहरीन आणि जॉर्डन यांसारख्या देशांमध्ये इराणने हल्ले चढवल्यामुळे संपूर्ण क्षेत्रातील सुरक्षा धोक्यात आली. या युद्धजन्य परिस्थितीत जागतिक तेल पुरवठा साखळी सुरक्षित ठेवण्यासाठी भारताची भूमिका अमेरिकेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. भारताने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयामुळे तेलाच्या किमती अनियंत्रित होण्यापासून रोखल्या गेल्या आहेत, असे अमेरिकन प्रशासनाचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com