Goa: कारापूर-सर्वण पंचायतीच्या माजी सरपंच अन् उपसरपंचांचा भाजपात प्रवेश

आमदार प्रवीण झांट्ये (MLA Praveen Jhantye) यांच्या उपस्थितीत या दोघांनी भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला.
Goa: Damodar Gurav
Goa: Damodar GuravDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: मये विधानसभा मतदारसंघातील (Maye Assembly Constituency) कारापूर-सर्वण पंचायतीचे उपसरपंच दामोदर गुरव (Damodar Gurav) आणि माजी सरपंच तथा विद्यमान पंच लक्ष्मण गुरव (Laxman Gurav) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गुरुवारी सायंकाळी डिचोली येथे आमदार प्रवीण झांट्ये यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मये मतदारसंघ भाजपच्या प्रभारी सुलक्षणा सावंत (Sulakshana Sawant) आणि आमदार प्रवीण झांट्ये (MLA Praveen Jhantye) यांच्या उपस्थितीत या दोघांनी भाजपमध्ये रीतसर प्रवेश केला.

यावेळी कारापूर-सर्वणचे जिल्हा पंचायत सदस्य महेश सावंत, मये भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद न्हावेलकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीची माजी अध्यक्ष अंकिता न्हावेलकर, कारापूर-सर्वणचे सरपंच गोकुळदास सावंत, पंच उज्वला कवळेकर, रश्मी नाईक, सुषमा सावंत आणि रसूल मदार तसेच मये पंचायतीचे पंच विश्वास चोडणकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार झांट्ये आणि सुलक्षणा सावंत यांनी दामोदर गुरव आणि लक्ष्मण गुरव यांचे पक्षात स्वागत केले.

Goa: Damodar Gurav
Goa: आपच्या बदनामीसाठीच दिल्लीत चर्च मोडण्याचे षडयंत्र : आपचा आरोप

भाजपच्या कार्याने आम्ही या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे दामोदर आणि लक्ष्मण गुरव यांनी सांगितले. गोकुळदास सावंत यांनी स्वागत केले. तर विश्वास चोडणकर यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com