Goa Politics: युतीचे शिल्पकार म्हणून नितीन गडकरी भूमिका बजावणार?

गोव्यात (Goa) नितीन गडकरींचा (Nitin Gadkari) दौरा प्रकल्प पाहणीसाठी की निवडणूकीसाठी?
Nitin Gadkari's visit to Goa
Nitin Gadkari's visit to GoaDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) येत्या 19 रोजी गोव्यात (Goa) येणार आहेत. केंद्र पुरस्कृत प्रकल्पांचा आढावा बैठकीच्या निमित्ताने ते येणार असले तरी भाजपच्या विधानसभा निवडणूक तयारीवरही त्यांची एक नजर असेल. (Nitin Gadkari's visit to Goa to inspect the project or for elections?)

भाजप-मगो युती होणार, याविषयी साशंकता नसल्याचे मानले जात आहे. या युतीचे शिल्पकार म्हणून गडकरी भूमिका बजावतील, असे दिसते. भाजपचे नेते स्‍व. प्रमोद महाजन, स्व. गोपीनाथ मुंढे यांच्यानंतर गडकरी यांनी एकहाती भाजपला विविध वेळेस विजय मिळवून देण्यात मदत केली होती.

Nitin Gadkari's visit to Goa
Goa: सावंत यांच्या राजीनाम्यानंतर दामोदर गुरव सरपंच पदाच्या शर्यतीत

दरम्यान आगामी काळात गोव्यात असणाऱ्या विधानसभा निवडणूकीवर सगळ्यात राजकीय पक्षांचे लक्ष आहे. दोन दिवसा आधीच आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुंख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोव्यात येवून गेले. नुसतेच येवून गेले नाही तर गोवेकरांना मोठमोठे आश्वासनही दिलेत. आता केंद्रीय रस्ते व महामार्गमंत्री नितीन गडकरी गोव्यात येवून काय बोलणणार कुणाशी भेटणार आणि त्याहून काय निष्कर्ष निघणार येाकडे लक्ष असणार आहे.

जरी गडकरी केंद्र पुरस्कृत प्रकल्पांचा आढावा बैठकीच्या निमित्ताने गोव्यात येत असले तरी तरी भाजपच्या विधानसभा निवडणूक तयारीवरही त्यांची एक नजर असणार असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण कुठे तरी आगामी निवडणूकीच्या काळात कोणता पक्ष कुणाशी युती करणार अशा चर्चा गोव्यात सध्या रंगत आहेत.

Nitin Gadkari's visit to Goa
Goa Politics: दिल्लीचा विकास गोमंतकीयांनी पहावा

गोव्यात पक्षांतर केलेल्या आमदारांनी जनतेची कामे केली नाहीत. त्यांनी स्वत:ची कामे केली. पैसा आणि पद यासाठी त्यांनी पक्षांतर केले, असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत केला होता. 'दिल्लीचा विकास गोमंतकीयांनी पहावा, असे उद्गार काढले होते. आता गोव्यात कोण विकास घडवून आणणार याबाबत गोव्यात चर्चा रंगत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com