Goa: रोटरॅक्ट क्लब ऑफ मडगावच्या अध्यक्षपदी लिओनेल गोम्स

मडगावी आयोजित कार्यक्रमात गोम्स (Lionel Gomes) सह इतर कार्यकारी समितीतील पदाधिकारी व सदस्यांचे अधिकारग्रहण पार पडले.
Rotaract Club of Madgaon
Rotaract Club of MadgaonDainik Gomantak
Published on
Updated on

रोटरॅक्ट क्लब ऑफ मडगावच्या (Rotaract Club of Madgaon) अध्यक्षपदी लिओनेल गोम्स (Lionel Gomes) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मडगावी आयोजित कार्यक्रमात गोम्स सह इतर कार्यकारी समितीतील पदाधिकारी व सदस्यांचे अधिकारग्रहण पार पडले.

क्लबचे नुतन सचिव म्हणुन सायली कोलवेकर (Saily Colveker) तर कोषाध्यक्ष म्हणून आनंद सरदेसाई (Anand Sardesai) यांची नियुक्ती करण्यात आली. इतर पदाधिकारी पुढील प्रमाणे ः- सहसचिव- दिव्येश नायक, क्लब सहायता संचालक - साईदीप पैंगीणकर, समाजसेवा संचालक - ईशानी कुडतरकर, व्यवसायिक सेवा संचालक - नेहा  पारकर, आंतरराष्ट्रीय सेवा संचालक - साहील गोसालिया, संपादक - राजय नाईक, लोकसंपर्क अधिकारी दीक्षा बरड, पल्स पोलिओ संचालक डॉ. वैशाली पैंगीणकर संपर्क अधिकारी - दिपंकर नायक., महिला सशक्तीकरण अधिकारी - श्रीया शिरोडकर, क्लब सल्लागार - डॉ. अक्षता अणवेकर, रवीश वेर्लेकर, डॉ. राधा वलीवलीकर, कार्यकारी समिती सदस्य - अनिश अग्नी, अखिलेश भिसे, विधी गोसालिया, लुझ फालेरिओ.

Rotaract Club of Madgaon
Goa Vaccination: मुंबईहून कोविड लसीचे 17 बॉक्स राज्यात दाखल

अधिकारग्रहण कार्यक्रमाला रोटरी आरआयडी 3170चे सहाय्यक राज्यपाल आशेश केणी प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. रोटरॅक्ट संस्था समाजाच्या उन्नतीसाठी  संपुर्ण उत्साहाने आणि वचनबद्धतेने कार्य करते असे केणी म्हणाले. अनिश्र्चीत महामारीच्या काळात क्लब अधिक आत्मविश्र्वासाने व उत्साहाने सर्व प्रतिकुल परिस्थितीचा सामना करीत आपला वारसा पुढे चालू ठेवेल असे नवनिर्वाचीत अध्यक्ष गोम्स यांनी सांगितले. अनीश अग्नी यानी संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले व सायली कोलवेकर हिने आभार व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com