Goa Medical College Hospital Dainik Gomantak
गोवा

Kolkata Doctor Rape Murder Case: राज्यात दोन दिवस ‘ओपीडी’ बंद! कोलकाता प्रकरणाचा तीव्र निषेध

Goa IMA: इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा विभाग आझाद मैदान ते जुने गोवे वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत मूक मोर्चा काढणार

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कोलकाता येथे महिला डॉक्टरचा बलात्कार करून खून करण्यात आला. तिला योग्य न्याय मिळावा, या मागणीसाठी इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) गोवा शाखेद्वारे शनिवारी (ता.१७) सकाळी ६ ते रविवारी (ता.१८) सकाळी ६ वाजेपर्यंत राज्यभर ‘ओपीडी’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

शनिवारी सकाळी ९ वा. पणजीतील आझाद मैदान ते जुने गोवे वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात येणार असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशन गोवा विभागाचे अध्यक्ष डॉ. संदेश चोडणकर यांनी सांगितले.

ते पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी ‘आयडीए’चे डॉ. पराग प्रभुदेसाई, गोवा डेंटल प्रायव्हेट असोसिएशनचे डॉ. अनिल डिसिल्वा, नर्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष निलिमा राणे, आयुर्वेदिक असोसिएशनचे डॉ. धर्मेंद्र प्रभुदेसाई, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे डॉ. राज वैद्य, फार्मसी असोसिएशनचे प्रसाद तांबा, ‘आयएमए’ डिचोलीचे अध्यक्ष डॉ. शेखर साळकर व इतर उपस्थित होते.

दरम्यान, डॉ. चोडणकर म्हणाले, मोठ्या प्रमाणात महिला वैद्यकीय क्षेत्रात तसेच इतर क्षेत्रात कार्यरत असून कामावर त्यांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे त्यामुळे सरकारने कामाच्या ठिकाणी कडक सुरक्षा पुरविणे गरजेचे आहे. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएनशनच्या निर्णयांना, त्यांच्या मागण्यांना तसेच मूक मोर्चाला इतर संघटनांनीदेखील पाठिंबा दर्शविला.

‘गोमेकॉ’त आंदोलन; आपत्कालीन सेवा सुरू

कोलकाता येथे झालेल्या घटनेचा निषेध तसेच डॉक्टर महिलेला न्याय मिळावा यासाठी गोवा निवासी डॉक्टर संघटनेने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात आज आंदोलन केले. या अचानक केलेल्या आंदोलनामुळे रुग्णांचे मात्र हाल झाले. रुग्णांना या गोष्टीची कोणतीच कल्पना नव्हती.

गोवा निवासी डॉक्टर संघटनेने या घटनेविरुद्ध संप करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ‘गोमेकॉ’तील आपत्कालीन सेवा सुरूच राहतील. रुग्णांच्या बाबतीत हलगर्जी होणार नाही. तसेच काही ‘ओपीडी’ही आवश्‍यकतेनुसार कार्यरत राहणार असल्याचे ‘गोमेकॉ’चे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी सांगितले.

‘आयएमए’च्या मागण्या

कोलकाता प्रकरणात तटस्थपणे चौकशी व्हावी व त्या महिला डॉक्टरला न्याय मिळावा.

कामाच्या ठिकाणी कडक सुरक्षा यंत्रणा असावी.

डॉक्टरांवर होणारे हल्ले व इतर घटनांसंबंधी सरकारने कठोर कायदा आणावा.

पीडित डॉक्टर महिलेच्या कुटुंबीयांना योग्य ती मदत करण्यात यावी.

‘गोमेकॉ’त कडक सुरक्षा हवी!

हा केवळ डॉक्टरांचा विषय नसून कामाला जाणाऱ्या प्रत्येक महिलेच्या सुरक्षेचा प्रश्‍न आहे. गोवा वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात महिला डॉक्टर, कर्मचारी कार्यरत आहेत. ‘गोमेकॉ’चा आवाका मोठा आहे. कोण येतो, कोण जातो काही समजत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही तसेच कडक सुरक्षा यंत्रणा असणे गरजेचे असल्याचे डॉ. शेखर साळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT