Goa House Regularization Dainik Gomantak
गोवा

Goa House Regularization: गोव्यात 2014 पूर्वीच्या घरांच्या नियमितीकरणाला मोठी मुदतवाढ; अर्जासाठी 6 महिन्यांऐवजी आता मिळणार 18 महिने

Goa House Regularization: कोमुनिदाद आणि सरकारी जमिनीवर २०१४ पूर्वी बांधलेल्या घरांच्या नियमितीकरणासाठी अर्ज करण्याची मुदत सहा महिन्यांवरून १८ महिने करण्यात आली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: कोमुनिदाद आणि सरकारी जमिनीवर २०१४ पूर्वी बांधलेल्या घरांच्या नियमितीकरणासाठी अर्ज करण्याची मुदत सहा महिन्यांवरून १८ महिने करण्यात आली आहे. राज्यपालांच्या ११ सप्टेंबरच्या मंजुरीनंतर गोवा विधिमंडळ डिप्लोमा क्रमांक २०७०, दिनांक १५ एप्रिल १९६१ मध्ये सुधारणा करणारा कायदा, २०२६ राज्य सरकारने अधिसूचित केला आहे.

यापूर्वी नियमितीकरणासाठी सहा महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली होती. नव्या सुधारणेनुसार नागरिकांना आता १८ महिन्यांच्या कालावधीत अर्ज करता येणार आहे. यासाठी यापूर्वी जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाची जागा नव्या कायद्याने घेतली आहे. या कायद्याला १० एप्रिल २०२६ पासून पूर्वलक्षी प्रभाव देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित कालावधीपासून लागू असलेल्या तरतुदींना या सुधारणेचा आधार मिळणार आहे.

कोमुनिदाद जमिनीवर २०१४ पूर्वी घरे बांधून राहणाऱ्या पात्र नागरिकांसाठी नियमितीकरणाच्या प्रक्रियेत अर्ज करण्याची संधी वाढविणे, हा या सुधारणेचा प्रमुख परिणाम आहे. सरकारी जमिनीवर २०१४ पूर्वी बांधलेल्या घरांच्या नियमितीकरणासाठी अर्ज करण्याची मुदत सहा महिन्यांवरून १८ महिने करण्यात आली आहे.

राज्यपालांची ११ सप्टेंबर रोजी मंजुरी मिळाल्यानंतर गोवा भू-महसूल संहिता (सुधारणा) कायदा, २०२६ राज्य सरकारने अधिसूचित केला आहे. या सुधारणेमुळे पात्र भूमिहीन रहिवाशांना सरकारी जमिनीवरील २०१४ पूर्वीच्या घरांचे नियमितीकरण करण्यासाठी अधिक कालावधी मिळणार आहे. यापूर्वी अर्ज करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत होती. ती आता १८ महिने करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: साहेबांची राजकीय उंबरठ्यावर धाव!

UPI Charges: ना टॅक्स, ना सेस... युपीआय पेमेंट्सबाबत अर्थमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं; ग्राहकांच्या खिशावर कोणताही भार पडणार नाही VIDEO

Crime News: धक्कादायक! रात्रीच्या वेळी जोडप्याला घेरलं, नंतर 7 जणांनी तरुणीसोबत...; व्हिडिओ व्हायरल होताच 3 आरोपींना बेड्या VIDEO

Goa Crime: चिठ्ठी, अंत्यसंस्कारासाठी पैसे अन् शांत निरोप; मोखर्डमध्ये 2 बहिणींचा हृदयद्रावक अंत, आत्महत्या केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट

PM Kisan 24th Installment Date: कधी रिलीज होणार पीएम-किसानचा 24वा हप्ता? त्याआधी उरका 'ही' 3 महत्त्वाची कामे, अन्यथा...

SCROLL FOR NEXT